ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलरोजगार/शिक्षण
Trending

पारे हायस्कूलचा तालुक्यात डंका

जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून आदर्श शाळा पुरस्काराने गौरव

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील पारे येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयास सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाचा वतीने आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर येथील हुतात्मा स्मृतीमंदिरात पार पडला.

सांगोला तालुक्यातील पारे येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय हे 1993 साली सुरू झाले असून गेली कित्येक वर्षापासून या शाळेची गुणवत्ता ही तालुक्यात अव्वलस्थानी आहे.

शालेय उपक्रमाबरोबर, गुणवत्ता,भौतिक सुविधा,मैदानी तसेच शालेय खेळ, वृक्रत स्पर्धा, विद्यार्थी हजेरी यासह ही प्रशाला या परिसरात नावाजलेली आहे. यासर्व गोष्टीची शहानिशा करून,सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने सांगोला तालुक्यातील या एकमेव शाळेला हा आदर्श शाळा पुरस्कार दिलेला आहे.

हा पुरस्कार राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने, शिक्षण उपसंचालक, विकास गरड, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, कार्याध्यक्ष शामराव कोळवले यांच्या उपस्थित देण्यात आला.

या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, शाल, पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्रशालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब पुकळे, संस्थेचे सचिव मधुकर गोरड यांनी स्वीकारला.यावेळी बयाजी मोठे,राजू गेजगे,संजय चव्हाण, प्रदीप कुलकर्णी,जगन्नाथ अठराबुद्धे,ज्ञानेश्वर माळी,सरलादेवी माने,नामदेव साळुंखे,मनोज गौड यांच्यासह अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

विद्यालयास मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुनील चव्हाण, संचालक मंडळ, पालक, ग्रामस्थ, माजी या सर्वांनी अभिनंदन केले.

“शहाजीबापू तुम्ही पवारांवर टीका करू नका”

 

अपघातानंतर कार पेटली, तरुण ड्रायव्हर जळून खाक

 

 

 

पाहा खास व्हिडिओ

 

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका