ताजे अपडेटशेतीवाडी
Trending

पाऱ्याचा पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प

दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा

Spread the love

सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात मागील चार दिवसापासून पावसाळा जोर वाढला असून जनजीवन विस्कळित झाले आहे. रविवार सायंकाळी सातच्या सुमारास घेरडी-जत रोडवरील पारे येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने बऱ्याच वेळ वाहतूक विस्कळीत झाली.

पुलावर तीन ते चार फूट पाणी असल्याने हलक्या व मध्यम स्वरूपाच्या वाहनांना हा पूल ओलांडणे शक्य नाही. त्यामुळे घेरडी ते जत मार्गावरील सर्व वाहतूक या पुलाच्या आजूबाजूला खोळंबली आहे. वरील भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तेथील पाणी या पुलावर आले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या भागातील ओढे नाले तुडुंब भरले आहेत. पारे येथील ब्रिटिशकालीन तलावही काठोकाठ भरला आहे.

https://youtu.be/ld4j8ZWX-1s

या पावसामुळे शेतातील कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत.

घेरडी – जत रोडवरील पारे येथील पूल मोठ्या प्रमाणात खचला आहे. हाच पूल खड्ड्यांनी व्यापला आहे. अशातच गेली चार दिवसापासून कोसळत असलेल्या पाऊसामुळे हा पूल रविवारी सायंकाळी पाण्याखाली गेला. यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रात्री आठ नंतर याच पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पाऊसामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे.

या परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. हा परतीचा पाऊस सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोसळत आहे.

 

राजू शेट्टींच्या विराट ऊस परिषदेने कारखानदारांना भरली धडकी

 

महाराष्ट्राचा धर्म कोणता?

 

मुख्यमंत्र्यांचा गोंधळ! चुकून यशवंत मनोहरांना वाहिली श्रद्धांजली

 

पेशवे आणि ब्रिटिशांना नडणारे छत्रपती प्रतापसिंह!

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका