शिक्षक समितीचा संघटनात्मक बांधणीवर भर : अमोगसिद्ध कोळी

कार्यकर्त्यांना संघटनात्मक बाबींवर जिल्हा शाखेच्या वतीने मार्गदर्शन

Spread the love

सांगोला / डॉ. नाना हालंगडे
न्यायाची चाड व आन्यायाची चीड हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दिलेले योगदान सामान्य शिक्षक बांधवांपर्यंत पोहचविण्यासाठी संघटना बांधणीकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी यांनी केलेे.


शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने शाखा संवाद बैठकांचे गेल्या महिन्याभरात आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून माळशिरस , बार्शी तालुक्याच्या बैठका संपन्न झाल्या .दोन्ही तालुका शाखांतील क्रियाशील प्रमुख कार्यकर्त्यांना संघटनात्मक बाबींवर जिल्हा शाखेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी श्री .कोळी बोलत होते .यावेळी संबंधित शाखांतील क्रियाशील पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्यांनी संघटनेची ध्येय , धोरणे, कार्य व शिक्षक बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली . या सर्व बाबी वाडीवस्तीवरील शिक्षक बांधवापर्यंत पोहचविण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित कण्याचे आवाहन त्यांनी केले .

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माळशिरस व बार्शी शाखेच्या बैठकांमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा माळशिरस शाखेचे अध्यक्ष शरद रुपनवर यांनी तर बार्शी शाखेचा आढावा शिक्षक समितीचे अध्यक्ष रामराजा ताकभाते यांनी सादर करीत आपापल्या तालुक्यातील शाखेच्या कामांचा तसेच संघटनात्मक कार्य , प्रलंबित प्रश्न , जिल्हा स्तरावरुन पाठपुरावा करावयाच्या प्रश्नांबाबत माहिती दिली .

आगामी काळातील विविध शिक्षक पतसंस्था व बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या.माळशिरस शाखा बैठकीत लाला गायकवाड , राजेंद्र उकीरडे , आत्माराम गायकवाड यांनी विविध विषयांवरील चर्चेत आपली भूमिका मांडली तर बार्शी येथील बैठकीत जिल्हा सोसायटीचे माजी चेअरमन विकास उकीरडे , रंगनाथ काकडे , भास्कर जाधवर , शिवाजी हावळे , श्री हरी गायकवाड ,दिपक काळे , माधव सांगळे , सुधीर घाडगे, सुनिल खाडे, बरचे सर यांनी विविध मुद्दे उपस्थित करुन संघटना बांधणी व कामकाजाबाबत चर्चेत सहभाग नोंदवला.
यावेळी शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र नवले, दयानंद कवडे, जिल्हाध्यक्ष अनिल कादे, माजी राज्य संपर्कप्रमुख सुरेश पवार, सुनिल कोरे,प्रताप काळे यांनी सर्वांची मते जाणून घेऊन आगामी काळात शिक्षक समितीची वाटचाल कशा पद्धतीने असेल याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी शिक्षक नेते राजन सावंत , चंद्रकांत पवार , सचिन गरंडे हे देखील दोन्ही शाखेतील संवाद बैठकीत सहभागी झाले होते. दोन्ही तालुक्यातील क्रियाशील कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी या बैठकांतून नेमके मार्गदर्शन करण्यात आले. या बैठका यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाखांतील पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका