थिंक टँक स्पेशल
Trending

शहाजी बापूंच्या नशिबी पूर्वीचेच विरोधक

Spread the love

चर्चा तर होणारच/ डॉ. नाना हालंगडे : सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जे दबाव तंत्राचे राजकारण घडले ते आजच्या व नवीन राजकीय नेत्यांच्या दृष्टीने नवीन जरी वाटत असले तरी त्यात फारसे काही वेगळे काही झाले,नसून 2024 च्या विधानसभा निवडणूक सारखे न होता 2017 च्या व त्यापूर्वीच्या निवडणुकीत जशी शेकापची इतर पक्षाबरोबर मैत्री होती तशीच डिसेंबर 25 च्या नगरपालिकेत घडलेली आहे.

1962 पासून प्रथम गणपतराव देशमुख आमदार झाले. त्यांचे त्यावेळचे व त्यानंतरही पूर्वी जनसंघ पक्ष आता त्यानंतर भाजप यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. तसे पाहता स्व. गणपतराव देशमुख यांच्या सांगोला शहरातील राजकारणाचे मार्गदर्शक अँड.पृथ्वीराज चव्हाण व स्व. डॉ.केळकर हेच होते. 1967 पासून शहर व तालुक्याच्या शेकापच्या राजकारणात शेकाप व काँग्रेस पक्षातील एक गट स्व. काकासाहेब साळुंखे पाटील व आता दीपक साळुंखे पाटील यांची मैत्री 2017 पर्यंत विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका, सहकारी संस्था,ग्रामपंचायत यामध्ये होती. 1990 पासून शेकापचे विरोधक म्हणून माजी आम.शहाजी पाटील हे होते.

असेच राजकारण 2019 पर्यंत चालू होत. 2019 ला माजी आमदार शहाजी पाटील व माजी आम्.दीपक साळुंखे पाटील हे विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र आले.स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी शेकापतर्फे निवडणूक लढविली व अल्पशा ६८५ मतांनी पराभूत झाले. सांगोला शहरातील पारंपारिक भाजपचा जो मतदार आहे,तो मतदार कायमस्वरूपी स्वर. गणपतराव देशमुख यांच्याकडेच असे,असे दिसून येत होते.त्यानंतर 2024 ला विधानसभा निवडणुकीत शहाजी पाटील व दीपक साळुंखे पाटील हे दोघे मित्र एकमेकाचे विरोधक बनले व डॉ. बाबासाहेब देशमुख दीपक साळुंखे पाटील आणि शहाजी पाटील हे वेगवेगळ्या पक्षातर्फे विधानसभा निवडणूक लढवली व त्यामध्ये शेकापचे देशमुख विजयी झाले.

डिसेंबर 2025 च्या नगरपालिका व त्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पूर्वीप्रमाणे शेकाप, दीपकआबा गट व भाजप हे एकत्र आले. त्यात वेगळे काही नाही,पूर्वी भाजप हा केंद्रात व राज्यात सत्तेत नव्हता म्हणून भाजप शेकापला मदत करीत होता. आज भाजप सर्व ठिकाणी सत्तेत असल्याने शेकाप भाजपकडे गेला त्यात वेगळे काय आहे. पूर्वी मैत्रीपूर्ण संबंध होते.आता काही शेकापचे नेते भाजपवासी झाले व निवडणूक लढवीत आहेत. मदतीला 2019 पूर्वीप्रमाणे माजी आम.साळुंखे पाटील आहेत. विरोधक माजी आम. शहाजी पाटील पूर्वीप्रमाणेच आहेत.त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात नेते इकडे तिकडे गेले तरी बाटलीतील माल तोच आहे.सांगोलकरांच्या राजकारणात काही फरक नाही.

फरक एवढाच आहे की स्व. गणपतराव देशमुख यांचे खंबीर नेतृत्व,शाहू फुले,डॉ.आंबेडकर यांचा कणखर विचार त्यांच्यामध्ये होता. त्यामुळे दलित, मुस्लिम अल्पसंख्यांक बहुजन समाज हे त्यांचे नेतृत्व मान्य करीत होते. परंतु विद्यमान आम.डॉ.देशमुख आता एक वर्षांपूर्वी आमदार झाल्याने त्यांच्या नेतृत्वाचीअद्याप परीक्षा झाली नाही.त्यामुळे ते कसा विश्वास संपादन करतील त्याच्यावरव त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होणार आहे.

माजी आम.शहाजी पाटील हे तालुक्यातील 1990 पासून राजकीय संघर्ष करीत आले आहेत. 1995 ला काँग्रेस पक्षाचे आमदार झाले.परंतु महाराष्ट्रात सत्ता भाजप,सेना युतीची आली. 1996 ला भाजपाचे नेते माजी मंत्री महादेव शिवणकर, अण्णासाहेब डांगे,गोपीनाथ मुंडे यांनी न्यू इंग्लिश स्कूलवर सभा घेऊन स्व. गणपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या विचाराने सांगोल्याचे राजकारण चालू राहील असा विश्वास दिला होता .

तर भाजपाचे सर्वेसर्वा गोपीनाथ मुंडे हे तर सातत्याने देशमुख यांचे मार्गदर्शन घेत होते. तरीही शहाजी पाटील डगमगले नाही ते सातत्याने संघर्ष करीत आले पुन्हा शेकाप चे मित्र दीपक साळुंखे पाटील यांच्या सहकार्याने 2019 ला आमदार झाले. पहिले अडीच वर्षे काळ कोरोना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कारकीर्द होती त्यामध्ये त्यांना फारसे काय करता आले नाही थोडेफार काही करता आले परंतु पाटील हे गुहाटी ला गेले व काय झाडी, काय डोंगर, सर्व ओके, या डायलॉगमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले व हवेत उडाले साडेपाच हजार कोटीहून अधिक विकास निधी आणून सांगोला शहर व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला व नोव्हेंबर 2024 ला पुन्हा ते जमिनीवर आले.

त्यानंतर डिसेंबर 2025 ला त्यांच्या नशिबी पूर्वीचेच विरोधक एकत्र आले त्यामुळे त्यांना त्यांच्या राजकारणात काही फरक पडला नाही पूर्वी मनी पावर नसल्याने म्यान, पावर जवळ येत नव्हती आता मॅन व मनी पावर जवळ असल्याने नगरपालिका निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणुकीत त्यांचीही परीक्षाच आहे कुणाचे नेतृत्व यशस्वी होते ही परीक्षाच आहे.

सांगोल्यात आनंदा मानेंचा प्रचार झंझावात

 

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका