सांगोल्यात आनंदा मानेंचा प्रचार झंझावात
नगरपालिका निवडणूक रणसंग्राम; बापूंच्या शिलेदारांनी घेतली आघाडी

स्पेशल रिपोर्ट/ डॉ.नाना हालंगडे
सांगोला अन् आनंदा माने गट हे समीकरण सांगोला शहरात फिक्सच झाले आहे. गतवेळच्या निवडणुकीत दोन्ही प्रस्थापितांना अस्मान दाखवीत त्यांनी पत्नी राणीताई आनंदा माने यांना जनतेतून नगराध्यक्ष केले होते. त्याचवेळी आनंदा माने गटाचे पाच सदस्य निवडून आले होते. त्यावेक पासून गटनेते पदाची भूमिका मिळविणाऱ्या आनंदा माने यांनी पाच वर्षात सांगोला शहराचा कायापालट केला. त्यात नंतर आम.शहाजी बापू पाटील यांच्या रूपाने भरच पडली अन् शहराच्या सर्वागीण विकासाला गतीच मिळाली. सध्या सुरू असलेल्या या निवडणुकीत आनंदा माने यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.
आता या २०२५ च्या निवडणुकीत माजी आम.शहाजीबापू यांच्या सेनेने सर्वच प्रभागात उमेदवार उभे करून, प्रचारास सुरुवात ही केली आहे. त्यामुळे आनंदा माने यांचा शहरात सध्या झंझावात पहावयास मिळत आहे.
जनतेतून नगराध्यक्ष ही दुसरी निवडणूक असून,शहरात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट आहे. अशातच सेनेकडून अर्थात बापू गटाकडून आनंदा माने यांनी प्रचाराचही सुरुवात केली आहे. यांच्यासह अन्य २३ नगरसेवक धनुष्यबाण चिन्हावर ही निवडणुक लढवीत आहेत. खरे तर सांगोल्यात प्रस्थपित असलेल्या व् भाजपाशी हातमिळवणी करीत दोन आजी माजी आमदार तर दुसरीकडे माजी आमदार यांच्या गटातील ही निवडणूक अटीतटी अशीच होणार आहे. असे हे विदारक चित्र असले तरी आनंदा माने यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे. सर्वच यंत्रणा मोठ्या प्रमाणात कामालाही लावलेली आहे.

माने कुटुंबीयांचा पूर्व इतिहास
आनंदा माने यांचे वडील गोरख महादेव माने १९९१ ते ९६ साली शेकापकडून नगरसेवक होते. त्यांच्या वहिनी सौ. कुशाला बिरुदेव माने २००६ ते २०११ नगरसेविका, उप नगराध्यक्ष होत्या. दुसऱ्या वहिनी सौ.शुभांगी तायाप्पा माने ह्या २००६ ते २०११ या पंचवार्षिक मध्ये नगरसेविका होत्या. २०१६ साली पत्नी सौ. राणीताई आनंदा माने ह्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा तर त्याच वेळी स्वतः आनंदा माने हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वडीलापासून त्याचा अखंड जनसेवेचा वारसा आज ही सुरू आहे.आनंदाभाऊने हे सारे गरिबीतून सध्या केले आहे. राजमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी शहरात विकासाचा डोंगर उभा केला आहे. याच भाऊनी स्वतःच्या जन्मदिनानिमित्त आतापर्यंत १०० हून अधिक मुलींच्या नावे सुरक्षित ठेव ठेवली आहे. २०१५ सालापासून शहरात मोठ्या प्रमाणत वृक्ष लागवड करीत हरित सांगोला ही संकल्पना उदयास आणली आहे. शहरात ८०० बाकडी दिलेली आहेत.
विश्वासाचं खणखणीत नाणं
सांगोला नगरपालिका निवडणुकीत युती आघाडीच्या ज्या काही अनपेक्षित घटना घडल्या त्या अनेकांना मान्य नाहीत, अशा चर्चा जनतेतून ऐकावयास मिळत आहेत. असे सर्व विदारक चित्र असले तरी, प्रचंड ध्येयवादी असलेल्या आनंदा माने यांना जनतेचा, शहरवासीयांच्या व् मोठ्या प्रमाणात युवकांचा असलेला पाठिंबा जणू विजयाची नांदीच देत आहेत. त्यातच हे विश्वासाचं खणखणीत नाणं असल्याचं ही मोठ्या प्रमाणात चर्चिल जात आहे.
धनुष्यबाण अनेकांना छेदणार?
माजी आमदार अँड.शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होत असून,सर्वच सदस्य हे जोमाने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शहराच्या व्हिजनसाठी आमची ही सेना प्रस्थापितांना अस्मान तर दाखविणार आहेच,तर नगराध्यक्ष पद व् २३ च्या २३ सदस्य निवडून आणून इतिहास निर्माण करणार आहेत. त्यामुळे विरोधकांना हा धनुष्यबाण छेदणार असल्याचे आनंदा माने यांनी सांगितले.
इतिहासात पहिल्यांदाच एका चिन्हावर निवडणूक
सांगोला नगरपालिका निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदाच एका चिन्हावर संपूर्ण पॅनलची ही निवडणूक होत आहे.हे सर्व तालुका वासियांना पहावयास मिळणार आहे. यात माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी आघाडी घेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद माने सह सर्वानाच निवडून आणण्याचा चंग बांधला आहे.
इलेक्शनचा नादच खुळा
हम है तैय्यार..अशीच माने सेनेची तयारी.त्यात जनतेनीच निवडणूक हातात घेतल्याने सेनेवाले माने सेना यांचा वरचश्मा पहावयास मिळत आहे.त्यातच नगराध्यक्ष पदाच्या वजिरासाठी भागमभाग होत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यातच आनंदाभाऊ यांनी आघाडी घेतली,असून आपली सर्व सेना कामाला जुंपली आहे.त्यातच सांगोल्यात माने या न माने सांगोले सिर्फ आनंदा माने अशाच पोस्ट फिरत आहेत.
बापूंच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे रविवारी सांगोल्यात



