ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलमनोरंजनराजकारण
Trending

‘पठाण’मध्ये माझ्याच केसांची कॉपी

अभिजित बिचुकलेचा शाहरुखवर आरोप

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे
“शाहरुख खानचा पठाण चित्रपटातील लूक माझ्यासारखा आहे. कारण मी बिगबॉसमध्ये असताना शाहरुख खान बिगबॉस पाहत होता,” असा दावा अभिजीत बिचुकलेने केला. तो साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होता.

बिगबॉस फेम अभिनेता अभिजीत बिचुकलेने अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील लूकबाबत मोठं विधान केलं आहे.

अभिजित बिचुकले म्हणाला, “कोणीतरी ट्वीट केलं आणि ती बातमी प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यात म्हटलं आहे की शाहरुख खानचा पठाणमधील लूक माझ्यासारखा दिसतो. ही एक सकारात्मक गोष्ट म्हटली पाहिजे.

माझी बिग बॉसमधील हेअरस्टाईल होती. १९९१ मध्ये मी लहान होतो तेव्हा संजूबाबा म्हणजे संजय दत्तचे लांब केस होते. मात्र, आता २२ वर्षांनी जी स्टाईल आणली गेली ती माझी.”

“मला वाटतं शाहरूख खान बिग बॉस बघत होता. सिझन नंबर १५ मध्ये मी काय करिष्मा केला, ‘मैंने क्या गुल खिलाए’ हे शाहरूखनेही पाहिलं आहे. लोकांनीही ते पाहिलं आहे. त्यामुळे ही लांब केसांची स्टाईल माझ्यामुळे ट्रेंडमध्ये आली असावी,” असं मत अभिजीत बिचुकलेने व्यक्त केलं.

अभिजीत बिचुकले पुढे म्हणाला, “शाहरुख खानचा पठाणमधील लूक माझ्यासारखा दिसतो. माझी बिग बॉसमधील हेअरस्टाईल तशी होती. मला वाटतं शाहरूख खान बिग बॉस बघत होता. त्यामुळे ही लांब केसांची स्टाईल माझ्यामुळे ट्रेंडमध्ये आली असावी.”

“सलमान खान आणि मी एका इंडस्ट्रीत आहोत. फिल्म इंडस्ट्री असेल किंवा राजकारण असेल इथं कोणी कोणाचा शत्रू असतो असं मला वाटत नाही. त्या त्यावेळी ते घडून गेलेलं असतं. राहिला विषय आज सलमान खानचा वाढदिवस आहे याचा, तर ते नेहमीप्रमाणे साजरा करत आहेत. त्या माणसाचंही माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे माणूस म्हणून त्याला माझ्या शुभेच्छा आहेच,” असंही अभिजीत बिचुकलेने नमूद केलं.


हेही वाचा

सुषमा अंधारे म्हणाल्या, “देवेंद्रजी यह डर होना जरुरी है.. मै एन्जॉय कर रही हुं”

वारकरी संप्रदायाचे वाटोळे कोणी केले?

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका