सज्जन मागाडे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सांगोला : विशेष प्रतिनिधी
मांजरी हायस्कूल उपशिक्षक तथा जवळा ग्रामपंचायतीचे सदस्य, युवक नेते सज्जन मागाडे यांना राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोलापूर येथील हरीभाई देवकरण प्रशाला येथे हा कार्यक्रम झाला.

मांजरी हायस्कूल मांजरीचे उपशिक्षक सज्जन श्रीधर मागाडे यांनी अध्यापनात नावीन्यपूर्ण प्रयोग राबविले आहेत. विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचालित राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोलापूर येथील हरीभाई देवकरण प्रशाला येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बापूसाहेब आडसुळ, गणेशभाऊ करे – पाटील, दत्तात्रय ननवरे, हरिश्चंद्र गाडेकर, दत्तात्रय काळेल, विश्वासकुमार घोडके, विजय खिलारी, प्रभाकर जाधव, सौ. संगीता जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सज्जन मागाडे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी अभिनंदन केले. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




सांगोला तालुक्यातील युवा हृदयसम्राट डॉ.अनिकेत (भैय्या) चंद्रकांत देशमुख
पाहा खास व्हिडिओ



