डिकसळ – पारे रस्त्यावर नुसतीच धूळफेक

उपअभियंत्याने आता हद्दच सोडली; पुन्हा रस्त्यावर मातीच

Spread the love

कालपासून डिकसळ ते पारे रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे जोरदार मोहीम सुरू आहे. हे खड्डे मुजवितानाही दूजाभाव केला जात आहे. एक खड्डा मुजविला की त्याच्या शेजारचा खड्डा मुजवीला गेला नाही. जे मुजविले त्यामध्येही डांबर कमी प्रमाणात वापरून नुसतीच मलमपट्टी केली आहे. एक प्रकारची मातीच टाकली आहे, असे पहावयास मिळत आहे.

सांगोला / नाना हालंगडे
अख्खा सांगोला तालुका खड्ड्यात घालणारा सार्वजनिक बांधकाम विभाग खूपच पराक्रमी दिसत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी या विभागाकडून ठेका दिला जातो. ठेकेदारही दिवसाढवळ्या खड्डे मातीत खालून, डिकसळ – पारे रस्त्यावर पराक्रम करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.


“सांगोला तालुका खड्ड्यात” या मथळ्याखाली मागील आठ दिवसांपासून विशेष वृत्तमालिका सुरू करण्यात आली होती. त्याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली. काही ठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी ठेकाही देण्यात आला. पण हे ठेकेदार नुसतीच मलमपट्टी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. कालपासून डिकसळ ते पारे रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे जोरदार मोहीम सुरू आहे. हे खड्डे मुजवितानाही दूजाभाव केला जात आहे. एक खड्डा मुजविला की त्याच्या शेजारचा खड्डा मुजवीला गेला नाही. जे मुजविले त्यामध्येही डांबर कमी प्रमाणात वापरून नुसतीच मलमपट्टी केली आहे. एक प्रकारची मातीच टाकली आहे, असे पहावयास मिळत आहे.

याच रस्त्यावर साईट पट्ट्याही अर्ध्या ते एक फुटाने उकरलेल्या आहेत. येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही कनिष्ठ अभियंता कामावर हजर नाही. त्यामुळे ठेकेदारानेही खड्डे बुजविण्याची ही नामी शकल लढविली आहे.

कालपासून वायफळ घाटापासून खड्डे बुजविले. ते काही तासातच आज उकरले आहेत. सध्या डिकसळ हद्दीतील माने – साळुंखे वस्तीवर हे काम सुरू आहे. पण त्या खड्डे बुजविण्यामध्येही गुणवत्ता नाही.

उपअभियंताच अकार्यक्षम
सांगोल्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपअभियंता अकार्यक्षम आहे. सांगोला तालुक्याचा रस्त्याचा निधी दुसऱ्या लोकप्रतिनिधींनी नेलेला आहे, असे सांगत आहे. पण सध्या तालुक्यातील रस्त्यासाठी जो निधी आला आहे, तोही खड्ड्यातच गेलेला पहावयास मिळत आहे. सध्या जी खड्डे बुजविन्याची मोहीम सुरू आहे, तेथे कोणीच कनिष्ठ अभियंता पाहणीसाठी नाही. त्यामुळे उपअभियंताच अकार्यक्षम आहे, असे वाटत आहे. त्यांना तालुक्यातील कोणताच रस्ता माहीत नाही.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका