आरोग्यताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी
Trending

‘न खाई भोगी तो सदा रोगी’

वाचा भोगी सण साजरा कसा केला जातो?

Spread the love

संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. फक्त या सणाला इतर ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. तामिळनाडूत हा सण ‘पोंगल’ म्हणून सजरा करतात. तर आसाममध्ये ‘भोगली बहू’ म्हणून साजरा करतात. तर पंजाबमध्ये ‘लोहिरी’, राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करुन चांगल्या गोष्टी अंगिकारल्या जातात.

थिंक टँक / नाना हालंगडे
महाराष्ट्रातील जानेवारीत येणारा पहिला सण म्हणजे, मकर संक्रांत (Makar sankrant). मकरसंक्रांतीच्या आधीचा दिवस ‘भोगी’ (Bhogi) म्हणून साजरा करतात. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’हे वाक्य तुम्ही ऐकलेच असेल. तामिळनाडूत हा सण ‘भोंगीपोंगल’ म्हणून साजरा करतात. तर आसाममध्ये ‘भोगली बहू’ म्हणून साजरा करतात. तर पंजाबमध्ये ‘लोहिरी’ (Lohri), राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या-वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. पण याचा नक्की अर्थ काय, ती का साजरी केली जाते? चला तर मग जाणून घेऊयात भोगीचे महत्त्व.

आज देशभरात भोगी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. हा सण तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भोगी आणि मकरसंक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत.

दक्षिण भारतात विशेषतः भोगी पंडीगायी नावाने हा दिवस साजरा केला जातो. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात विविध नावांनी साजरा केला जातो. मत्तू पोंगल,कान्नुम पोंगल अशी याला नावे आहेत.

भोगी हा उपभोगाचा सण होय असे मानले जाते. या दिवशी स्त्रिया अभ्यंगस्नान करतात. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात. त्यातल्या पहिल्या दिवसाला ‘भोगी पोंगल’ असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते.

भोगीवर, लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते. पहाटेच्या वेळी, लोक लाकूड, इतर घन-इंधन आणि घरातील लाकडी फर्निचरसह शेकोटी पेटवतात जे यापुढे उपयुक्त नाहीत. हे वर्षाच्या खात्यांची समाप्ती आणि दुसऱ्या दिवशी कापणीच्या पहिल्या दिवशी नवीन खात्यांची सुरुवात दर्शवते.

संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. फक्त या सणाला इतर ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. तामिळनाडूत हा सण ‘पोंगल’ म्हणून सजरा करतात. तर आसाममध्ये ‘भोगली बहू’ म्हणून साजरा करतात. तर पंजाबमध्ये ‘लोहिरी’, राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करुन चांगल्या गोष्टी अंगिकारल्या जातात.

जणू मिक्स व्हेज
यावेळेस मटार, गाजर, वांगी, तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते. त्यामुळे या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. ती लोण्यासह खातात. विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी केली जाते.

भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) आणि त्यासोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे भोगीची भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच.

भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. मात्र, ती करण्याच्या पद्धतीत थोडाबहुत फरक असतो. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजीही तिळाचा कूट घालून केली जाते.

आहारातील महत्त्व
बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत. थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भोगीच्या दिवशी या पदार्थांचा जेवणात विशेष समावेश केला जातो.

मुली येतात माहेरी
या दिवशी मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात. या सणाच्या दिवशी घर तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करुन घराच्या अंगणाभोवती रांगोळी काढण्यात येते. घरातील सर्वजण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे. यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही, असे बोले जाते.


हेही वाचा

“उर्फी के अंडरवेअर मे छेद है.. चित्राताई ग्रेट है”

जेनेरिक औषधे इतकी स्वस्त कशी?

एनडीटीव्ही : भारतीयांच्या अपेक्षेचेही अधिग्रहण

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका