आरोग्यताजे अपडेटथिंक टँक स्पेशलमनोरंजनमाध्यमविश्वराजकारणरोजगार/शिक्षणविज्ञान/तंत्रज्ञानशेतीवाडी

आज “या वेळेत” गणेशमूर्ती आणणे ठरेल लाभदायी!

वाचा किती वाजता आहे मुहूर्त

Spread the love

थिंक टँक / नाना हालंगडे
गणेश चतुर्थी आज बुधवार 31 ऑगस्ट रोजी आहे. गणेश चतुर्थीमुळे सर्वांनाच गणपती बाप्पाच्या आगमणाचे वेध लागले आहेत.

महाराष्ट्रात गणेश चतुर्थीपासून 10 दिवस मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. 10 दिवस गणपतीची स्थापना केल्यानंतर बाप्पांचे विसर्जन केले जाते. वर्षातून एकदा येणाऱ्या या गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व असते. याशिवाय बुधवार हा दिवस श्री गणेशाला समर्पित असतो. बुधवारी गणेशाची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात अशी मान्यता आहे.

यंदा हे दोन्ही योग एकत्र आले आहेत. या यावेळी गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट रोजी आहे आणि या दिवशी बुधवार आहे. त्यामुळे या चतुर्थीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. जाणून घेऊया भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि व्रत विधी.

गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त
गणेश चतुर्थी तिथी : 31 ऑगस्ट 2022 रोजी आहे
चतुर्थी तिथी प्रारंभ : 30 ऑगस्ट 2022, मंगळवार, दुपारी 3:33 वाजता
चतुर्थी तिथी समाप्ती : 31 ऑगस्ट 2022, बुधवारी दुपारी 3:22 वाजता

दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
ब्रह्म मुहूर्त स : ०४:११ मी पासुन ते दुपारी ०३:२३ मी पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..

उदयतिथीनिमित्त गणेश चतुर्थी व्रत 31 ऑगस्ट रोजी ठेवण्यात येणार आहे. या दिवशी गणेशाची पूजा करण्याचा.शुभ मुहूर्त दुपारी 11:05 ते 1:38 पर्यंत आहे. तर 09 सप्टेंबर 2022 रोजी गणेश विसर्जन होणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात बाप्पाची स्थापना करून त्याची विधीवत पूजा वगैरे केल्याने भक्तांचे सर्व अडथळे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. गणेशाची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

सिद्धगिरी मठ, कोल्हापूर येथील माहेश्वर श्री. चंद्रकांत स्वामी यांनी कळविले आहे की,
गणपती आणण्यासाठी मुहूर्त वेळ सकाळी ७ ते ९, दुपारी ११ ते १२, दुपारी २ ते रात्री ९ पर्यंत उत्तम. (राहू काळ: दुपारी १२ ते दिड पर्यंत)

गौरी आणण्यासाठी मुहूर्त वेळ: शनिवार ३/९/२०२२ रोजी साडेसात ते नऊ, सकाळी अकरा ते पाच.
(राहू काळ: सकाळी नऊ ते साडे दहापर्यंत)

गौरी गणपती विसर्जन मुहूर्त वेळ सोमवार, ५/९/२०२२ रोजी सकाळी नऊ ते अकरा तसेच दुपारी दोन ते रात्री नऊ पर्यंत.
(राहू काळ: सकाळी साडे सात ते नऊपर्यंत.

पाहा खास व्हिडिओ

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका