ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलरोजगार/शिक्षण
Trending

सोनंदच्या लेकीने तालुक्याचे नाव केले उज्ज्वल

स्नेहल पाटणेची युरोपीय कंपनीत निवड

Spread the love

सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील सोनंद गावाची कन्या स्नेहल वसंत पाटणे हिची कोर्टी येथील इंजिनीरिंग कॉलेजमधून टेलीकम्युनिकेशन विभागातून युरोपीय कंपनीत निवड झाली आहे. नामांकित परदेशी कंपनीत पदार्पणातच जॉईन होणारी ही सांगोला तालुक्यातील पहिलीच कन्या आहे.

स्नेहल वसंत पाटणे हिला साडे तीन लाखाचे पॅकेज मिळाले आहे. हीच कन्या डिसेंबर 2022 मध्ये या कंपनीत जॉईन होणार आहे. त्यामुळे सोनंद बरोबर सांगोला तालुक्याचे नाव या मुलीने उज्ज्वल केले आहे.

विशेष म्हणजे या कंपनीत जॉईन होणारी ही सांगोला तालुक्यातील पहिलीच कन्या आहे.

स्नेहल पाटणे हिने खडतर जीवनातून हे यश मिळविले असून, घरची परिस्थिती खूपच हलाकीची आहे. आई – वडील मोलमजुरी करतात. तर दोघे लहान बंधूही आपली ओसाड जमीन कसित आहेत. यांना शेतजमीन आहे पण पाणीच नसल्याने शेती पिकत नाही.

असे हे खडतर जिणे असतानाही स्नेहलने कठोर मेहनत करीत आपले डिग्रीचे शिक्षण पूर्ण करीत युरोपीय कंपनीत जॉब मिळविला आहे.

याच स्नेहल हिने प्रारंभीचे शिक्षण डिप्लोमा शिवाजी पोलिटेक्नीक कॉलेज सांगोला येथे पूर्ण केले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण कोर्टी येथील एस.के.एन.सिंहगड कॉलेज आँफ इंजिनिरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.

ट्रान्सफिक्स कंपनीमध्ये तिची निवड झाली असून ही कॅम्पस प्लेसमेंट निवड आहे. तिच्या या निवडीबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

माझ्या साडूची मुलगी स्नेहल वसंत पाटणे ही अभ्यासात तरबेज होती. शिकून काही तरी जगावेगळे करून दाखवायचे हीच तिची जिद्द कामी आली आहे. जरी ही सोनंदची असली तरी डिकसळमध्ये आमच्याकडेच राहायला असायची. तिच्या या यशाने आम्ही सर्वचजण आनंदले आहोत. कालपासून सर्वांचेच अभिनंदनाचे फोन येत आहेत. – डॉ.नाना हालंगडे, डिकसळ

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका