गुन्हेगारीताजे अपडेटराजकारण
Trending

श्रीकांत देशमुख यांच्याबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Spread the love

मुंबई उच्च न्यायालय येथे बहुचर्चित श्रीकांत आप्पासाहेब देशमुख (माजी जिल्हाप्रमुख भाजप) यांच्या जमीन अर्जावर सुनावणी झाली. अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती श्रीमती अनुजा प्रभू देसाई यांच्यापुढे सुनावणी झाली असता न्यायमूर्तीनी श्रीकांत आप्पासाहेब देशमुख यांचा सदर प्रकरणात अटक पूर्व जामीन मंजूर करत कायमस्वरूपी अर्ज निकाली काढला आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत आप्पासाहेब देशमुख यांच्याबाबत एक मोठा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. देशमुख यांना अटकपूर्व जामीन मंजूर करत कायमस्वरूपी अर्ज निकाली काढला आहे.

मुंबई उच्च न्यायालय येथे बहुचर्चित श्रीकांत आप्पासाहेब देशमुख (माजी जिल्हाप्रमुख भाजप) यांच्या जमीन अर्जावर सुनावणी झाली. अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती श्रीमती अनुजा प्रभू देसाई यांच्यापुढे सुनावणी झाली असता न्यायमूर्तीनी श्रीकांत आप्पासाहेब देशमुख यांचा सदर प्रकरणात अटक पूर्व जामीन मंजूर करत कायमस्वरूपी अर्ज निकाली काढला आहे.

आज उच्च न्यायालयात श्रीकांत आप्पासाहेब देशमुख यांच्या बाजूने वरिष्ठ विधीज्ञ श्री. शिरीष गुप्ते, श्री. आशिष गायकवाड, श्री. उज्वल अगंदसुर्वे यांनी यशस्वीरित्या कायदेशीर बाजू मांडली.

उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करतेवेळी आदेशात तक्रारकर्ता व अर्जदार यांचे एकमेकांचे 2018 पासूनचे नातेसंबंध आणि जुनी मैत्री होती. त्याचबरोबर ” अर्जदार हे विवाहित होते , याची पूर्ण जाणीव तथा याची पूर्ण कल्पना तक्रारदार महिलेस पहिल्यापासूनच होती. तरी आपसातील प्रेम संबंध परस्पर संमतीनेच ठेवले व तसेच तक्रार दाखल करेपर्यंत त्यांनी ठेवले होते. त्यामुळे अशा स्वरूपाच्या सदर घटना हा बलात्कार सारखा गुन्हा केला असे म्हणता येणार नाही” असे मत नोंदवून पुढील तपासादरम्यान श्रीकांत देशमुख यांना पोलीस अधिकाऱ्यास वेळोवेळी उपस्थित राहून असेच सहकार्य करण्याचे आदेश पारीत केले आहेत.

याबाबतची माहिती ॲड. आशिष गायकवाड (वकील उच्च न्यायालय) यांनी दिली आहे.

काय आहे नेमके प्रकरण
भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी लग्न करतो असे सांगून फसवणूक तसेच बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या प्रकरणावरून बरेच राजकीय वादंग निर्माण झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर देशमुख यांनी स्वतः पदाचा राजीनामा दिला होता.

मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका