सांगोल्यात अजित पवार गटाला मिळणार नवा भिडू!
अतुल पवारांना संधी मिळण्याची शक्यता

विशेष वृत्त/डॉ.नाना हालंगडे
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सांगोल्यात लवकरच नवीन नेतृत्व मिळणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांच्यावर सांगोला तालुक्याची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस उतरणार असल्याचे “थिंक टँक” शी बोलताना सांगितले.
माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी गतवर्षी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा पदाचा राजीनामा दिला आणि ऐन निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून सांगोला तालुक्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्व विना पोरकी झाली आहे. दरम्यान विधानसभा निवडणुका झाल्यानंतर माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील ठाकरे सेनेतून पुन्हा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस स्वगृही परतणार अशी चर्चा होती.
या पार्श्वभूमीवर सांगोल्यात जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्त्याचा तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला होता. मेळाव्यात कार्यकर्त्यांनी दीपक आबांच्या विषयी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. त्यानंतरही दीपक आबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेशाची चर्चा होत होती. आता दीपक आबांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला ब्रेक मिळाला आहे.
मध्यंतरी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला सांगोल्यातून माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार उपस्थित होते.त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांशी राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच अतुल पवार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून त्यांच्यावर सांगोला तालुक्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे.
खास व्हिडिओ
बापूंच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे रविवारी सांगोल्यात



