थिंक टँक स्पेशल

कोळ्यात बाजरी पिकाला चार फुटाचे कणीस

राजस्थानहून आणले बियाणे; बाजरी पाहण्यासाठी तोबा गर्दी

Spread the love

वाले यांनी 20 गुंठ्यात ही बाजरी घेतली असून त्यातून उत्पन्न चांगले निघेल असा अंदाज आहे. नियमित करण्यात येणाऱ्या बाजरी पिकापेक्षा तिपटीने जास्त उत्पादन बाजरी पीक देते असा दावाही वाले यांनी केला. बाजरी बियाण्याची जात तुर्की असून कणसाची लांबी 4 ते 5 फूट आहे. वीस गुंठ्यात अर्धा किलो बियाणे लागले. विशेष म्हणजे यासाठी मोजकीच खते त्यासाठी वापरले आहेत.

सांगोला/ नाना हालंगडे
बाजरी तसे पारंपरिक पीक सर्वांनीच अनुभवले, पण आजवर आपण साधारण फूटभर लांब कमीच पाहिले असेल मात्र सांगोला तालुक्यातील कोळा येथील राहुल वाले शेतकऱ्याने पेरलेल्या बाजरीला तब्बल चार फुटापर्यंत लांबीचे कणीस लागल्याने ही आश्चर्यकारक बाब परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

शेतकरी वर्ग पारंपरिक पिकाकडे पाठ फिरवून नगदी पिकाकडे वळाला असताना आता पारंपरिक पिकातही नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत

सांगोला तालुक्यातील कोळा येथील शेतकरी राहुल वाले यांनी लावलेल्या बाजरीला तीन ते चार फुटापर्यंत कणीस लागल्याने ते पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. वाले यांनी राजस्थान वरून पोस्टाने एक हजार रुपये किलो दराने बाजरीचे गावठी बियाणे आणून त्याची आपल्या शेतात पेरणी केली होती. यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने पीक चांगले जोमात आले बहरलेल्या बाजरीला तब्बल तीन ते चार फुटापर्यंत कणीस लागल्याचे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

वाले यांनी 20 गुंठ्यात ही बाजरी घेतली असून त्यातून उत्पन्न चांगले निघेल असा अंदाज आहे. नियमित करण्यात येणाऱ्या बाजरी पिकापेक्षा तिपटीने जास्त उत्पादन बाजरी पीक देते असा दावाही वाले यांनी केला.

बाजरी बियाण्याची जात तुर्की असून कणसाची लांबी 4 ते 5 फूट आहे. वीस गुंठ्यात अर्धा किलो बियाणे लागले. विशेष म्हणजे यासाठी मोजकीच खते त्यासाठी वापरले आहेत.

आपल्या भागातील बाजरी व तुर्की जात असलेल्या बाजरीमध्ये फरक असल्याचा वाले यांनी सांगितले. तुर्की जात असलेल्या बाजरीमध्ये उष्णता कमी प्रमाणात असल्यामुळे ही बाजरी मुळव्याध व शुगर असलेले नागरिकही खाऊ शकतात.

मी राजस्थान वरून एका शेतकऱ्याकडून पोस्टाने बाजरीचे बियाणे मागवले होते. मी वीस गुंठ्यात अर्धा किलो बियाने पेरले असून व या बाजरीला किरकोळ खते वगळता फक्त पाणीच दिले आहे. सध्या माझ्या शेतात तीन ते चार फुटाचे कणीस लागले असून हा प्रयोग मी प्रथमच केला आहे. – राहुल वाले शेतकरी, कोळा

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका