ताजे अपडेट
Trending

सोलापूर जिल्ह्यात कोरोना फास आवळतोय

महिलेच्या मृत्यूने महासंकटाची चाहूल

Spread the love

शहरात एकूण १५ रुग्ण कोरोनाचे आढळले आहेत. झोपडपट्टी भागातील अनेक ओपीडींमध्ये सर्दी खोकल्याचे रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना संसर्गजन्य आजार शहरात फोफावत आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क (नाना हालंगडे) : कोरोना एकदाचा गेला म्हणून बिनधास्त असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने हळूहळू फास आवळायला सुरुवात केली आहे. सोलापूर शहरात दररोज रूग्णसंख्या वाढू लागली असून एका कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूने महासंकटाची चाहूल दिसून येत आहे.

जिल्ह्यात १२६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाला. त्यात रॅपिड अॅन्टीजेन टेस्टचे २८ तर आरटीपीसीआर टेस्टचे ९८ जण होते. त्यापैकी ११८ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून ८ जणांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. यात ३ पुरूष तर ५ महिलांचा समावेश आहे.

देशात H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. सर्दी-खोकला, ताप या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकांना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे.

महिलेच्या मृत्यूने महासंकटाची चाहूल
धक्कादायक बाब म्हणजे, कोरोना साथीने ग्रस्त असलेल्या एका ८० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. मयत झालेली महिला ही सोलापूर शहरातील बुबणे चाळ, रेल्वे लाईन परिसरातील आहे. मृत महिलेचे वय ८० होते. त्यांना दमा, पक्षाघात झाला होता. संबंधित वृद्ध महिलेला सोलापूर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना ११ मार्च २०२३ रोजी पहाटे शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सध्या H3N2 इन्फ्लुएंझा व्हायरस झपाट्याने पसरू लागला आहे. सर्दी-खोकला, तापाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. या इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये विशेषत: खोकल्याची समस्या सर्वसामान्य आहे. अनेकांना खोकल्याच्या समस्येनं बेजार केलं आहे. या H3N2 इन्फ्लुएंझा व्हायरसमुळे आरोग्य प्रशासनही चिंतेत आहेत. रुग्णालयात तसेच आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

सोलापूर शहरात कोरोना सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. झोपडपट्टी भागातील अनेक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. जास्त गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रसाराचा सर्वाधिक धोका आहे.

शहरात कोरोनाचे १५ रुग्ण
सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहरात एकूण १५ रुग्ण कोरोनाचे आढळले आहेत. झोपडपट्टी भागातील अनेक ओपीडींमध्ये सर्दी खोकल्याचे रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना संसर्गजन्य आजार शहरात फोफावत आहे. सोलापूर शहर आरोग्य प्रशासन आणि जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका