रोजगार/शिक्षण

डिकसळचा राज्यात डंका

प्रज्ञाशोधमध्ये प्रज्वल करांडे राज्यात पहिला

Spread the love

डिकसळ आश्रमशाळा ही जिल्ह्यात अव्वल असून सतत विविध परीक्षा, क्रीडा स्पर्धा यामध्ये यांचे विद्यार्थी चमक दाखवीत आहेत. प्रज्वल याने राज्यात पहिला क्रमांक पटकाविल्याने मुख्याध्यापक तुकाराम भुसनर,मुख्याध्यापक शिवाजी कुंभार यांच्यासह संस्थचे अध्यक्ष, सचिव,सर्व संचालक यांनी अभिनंदन केले.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा डिकसळ ता.सांगोला या प्रशालेचा विद्यार्थी प्रज्वल काकासाहेब करांडे याने ए.टी.एस.राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२३ इ.पहिलीमध्ये १०० पैकी १००गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. सदरची परीक्षा इ.पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी घेतली जाते.

प्रज्वलने मंथन परीक्षा२०२३मध्येही राज्य गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक तसेच अक्षरगंगा प्रद्नाशोध परीक्षा२०२३मध्ये राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. या सर्व स्पर्धा परीक्षामध्ये देदीप्यमान यश संपादन करून शाळेचा नावलौकीकात भर घातली आहे. प्रज्वल हा डिकसळ आश्रम शाळेचे आदर्श शिक्षक काकासाहेब करांडे यांचे चिरंजीव आहे. हा प्रज्वल आता दुसरीच्या इयत्तेत गेलेला आहे. तल्लख बुद्धीचा हा प्रज्वल अभ्यासात खूपच तरबेज आहे. इंग्लिशही अस्सल बोलतो.

प्रज्वलने मंथन परीक्षा२०२३मध्येही राज्य गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक तसेच अक्षरगंगा प्रद्नाशोध परीक्षा२०२३मध्ये राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. या सर्व स्पर्धा परीक्षामध्ये देदीप्यमान यश संपादन करून शाळेचा नावलौकीकात भर घातली आहे.

याच प्रज्वलने यापूर्वीही पहिलीत प्रवेश घेण्याअगोदर ही याच परीक्षेत यश प्राप्त केले होते. प्रज्वल करांडे हा याच प्रशालेतील आदर्श शिक्षक काकासाहेब करांडे यांचा मुलगा आहे. तल्लख बुद्धीचा हा प्रज्वल पहिलीत असला तरी, खूपच हुशार आहे.

डिकसळ आश्रमशाळा ही जिल्ह्यात अव्वल असून सतत विविध परीक्षा, क्रीडा स्पर्धा यामध्ये यांचे विद्यार्थी चमक दाखवीत आहेत.

प्रज्वल याने राज्यात पहिला क्रमांक पटकाविल्याने मुख्याध्यापक तुकाराम भुसनर,मुख्याध्यापक शिवाजी कुंभार यांच्यासह संस्थचे अध्यक्ष, सचिव,सर्व संचालक यांनी अभिनंदन केले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका