सांगोल्यात दिवाळीत ३५ कोटींची उलाढाल

दीपावली सण लय मोठा, नाही आनंदाला तोटा

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
सांगोला शहारासह तालुक्यात दीपावली सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. एका महिन्यात दोन पगारांसह बोनस मिळाल्याने ग्राहकांचा हात सैल झाला. साडेतीन मुहूर्तातील मुहूर्तावर सोने, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला उधाण आले. दिवाळी पाडव्यानिमित्त बाजारपेठ फुलून गेली होती. सराफ पेठेसह वाहनांचे शोरूम, मोबाइल शोरूम, कापड आदी बाजारपेठेत सुमारे ३५ कोटींची उलाढाल झाली, असा अंदाज आहे.


कोरोनाने कोलमडलेल्या बाजारपेठेला दिवाळी सणाने उभारी दिली आहे. पंढरपूर पाण्याचं, मंगुड दाण्याचं अन् सांगुलं सोन्याचं असच काहीस दिसून आलं. गेली दोन वर्षापासून दीपावली सण हा कोरो ना संकटात गेला. यामध्ये विशेषतः दुसऱ्या लाटेचा खूप मोठा परिणाम झाला, त्यामुळे ही उलाढाल कमीच झाली. अनेक कुटुंबानी दीपावली साजरी केली नाही. तरीही ३५ कोटीपर्यंत ही उलाढाल गेली.

सांगोला शहरासह तालुक्यातील कोळा, जुनोनी, जवळा, महुद,घेरडी, कडलास, मेडशिंगी, आदीसह अन्य गावांमध्ये हि दिपावलीची खरेदीची लगबग पहावयास मिळाली, यामध्ये विशेषतः सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात दिसून आली. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे खरेदीचा जोम पहावयास मिळाला. महागाई मोठी असतानाही अनेकांनी ही दीपावली धुमधडाक्यात साजरी केली.यामध्ये अजून ही वाढ झाली असती पण तालुक्यातील तांडेच्या तांडे ऊस तोडणी हंगामावर गेल्याने यामध्ये घट पहावयास मिळाली. एकंदरीत ही दीपावलीचा उलाढाल ३५ कोटी रुपयाची झाली असल्याचे समजते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका