ताजे अपडेट
Trending

माणनदीच्या पुलावरून जीवघेणा प्रवास

Spread the love

सांगोला-जत या राष्ट्रीय महामार्गावर टोल नाका नसल्याने टोळ वाचवण्यासाठी तसेच कोल्हापूर मार्गे बेंगलोरला गेल्यास दीडशे किलोमीटर अंतर जादा लागते. त्या दृष्टीने डिझेलची बचत व वेळ वाचवण्यासाठी मुंबई,दिल्ली, हरियाणा,पंजाब आधी उत्तर भारतातून येणारे अवजड वाहने अकलूज,टेंभुर्णी,पंढरपूर मार्गे सांगोला येऊन ते जतला जातात. तेथून पुढे विजापूर बेंगलोर चेन्नईला जातात टोळ वाचतो. म्हणून अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात ये जा करतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

सांगोला/डॉ.नाना हालंगडे

सांगोला-जत-विजापूर-बेंगलोर-चेन्नई या राष्ट्रीय महामार्गावर जतपर्यंत टोलनाका नसल्याने तसेच इतर मार्गापेक्षा दीडशे किलोमीटर अंतर व वेळ वाचवण्यासाठी अवजड वाहतूक कडलास गावातून जात असल्याने मोठ्या प्रमाणात होत अपघाताचे प्रमाण वाढले असून, सदर मार्गावरील वाहतूक सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत बंद ठेवावी व कडलास गावाच्या बाजूने बाह्य वळण रस्ता तयार करावा,अशी मागणी कडलास ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.

सांगोला-जत या राष्ट्रीय महामार्गावर टोल नाका नसल्याने टोळ वाचवण्यासाठी तसेच कोल्हापूर मार्गे बेंगलोरला गेल्यास दीडशे किलोमीटर अंतर जादा लागते. त्या दृष्टीने डिझेलची बचत व वेळ वाचवण्यासाठी मुंबई,दिल्ली, हरियाणा,पंजाब आधी उत्तर भारतातून येणारे अवजड वाहने अकलूज,टेंभुर्णी,पंढरपूर मार्गे सांगोला येऊन ते जतला जातात. तेथून पुढे विजापूर बेंगलोर चेन्नईला जातात टोळ वाचतो. म्हणून अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात ये जा करतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच त्यासाठी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत अवजड वाहने बंद ठेवावी तसेच कडलास बाह्य वळण रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशा मागणीचा ठराव कडलास ग्रामपंचायतीने केला असून, तशा प्रकारचे निवेदन आम. बाबासाहेब देशमुख, जिल्हाधिकारी सोलापूर,कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यालय सोलापूर यांना दिले आहे.

सांगोला-जत या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनाची रांग लागलेली असते. तसेच या मार्गावरील सांगोल्यापासून पाच किलोमीटर अंतरावर माणनदी असून या नदीवर नवीन पुलाचे काम गेली सहा वर्षापासून रखडले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला दोन ते तीन किलोमीटर रस्त्याची कामही पुलामुळे थांबलेले आहे.या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले असून, अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना त्या ठिकाणी जीव गमवावा लागलेला आहे .तसेच धुळीचे साम्राज्य जास्त असल्याने दुचाकी स्वारांचे तसेच इतर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याच मार्गावर जवळा, घेरडी ,सोनंद ही मोठी लोकसंख्याची गावे असून तसेच याच मार्गावर महाविद्यालय व इंजिनिअरिंग कॉलेज असल्याने त्या मार्गावरून विद्यार्थी, विद्यार्थिनी ,नागरिक पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात ये जा करीत असतात सदर पुलाचे काम आमदार समाधान आवताडे यांनी घेतले असल्याची कडलास गावचे ग्रामस्थ चर्चा करीत असून,त्यांच्या राजकीय वजनामुळे कामे रेंगाळलेली आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लक्ष घालावे अशी मागणी कडलास ग्रामस्थांनी केली आहे.

सदरचे काम सहा वर्षापासून रखडलेले आहे ते त्वरित व्हावे अशी मागणी कडलास ग्रामपंचायतीचे सरपंच दिगंबर भजनावळे तसेच अँड.नितीन गव्हाणे,दत्ता जाधव समाधान पवार अरुण वाघमोडे या कार्यकर्त्यांनी केले आहे.

ही अवजड वाहने सांगोला शहरातून कडलास नाक्यावर येऊन पंढरपूर मार्गावर जात असता त्या चौकामध्ये मोठाले खड्डे पडलेले आहे. सदर खड्डे बुजवावे यासाठी नगरपालिका, तसेच सार्वजनिक बांधकाम खाते यांच्याकडे सातत्याने नागरिक मागणी करीत असून,देखील त्याची दखल मुख्याधिकारी व उपअभियंता घेत नाहीत. सदर ठिकाणचे खड्डे तसेच पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिगंबर भजनावळे, नितीन गव्हाणे,अरुण वाघमोडे यांनी दिला आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका