खटले गावात मिटविले तर लोकांची प्रगती होईल : मुख्य न्यायाधीश पी.ए.पाटील
डिकसळमध्ये कायदेविषयक शिबिर संपन्न
सांगोला (नाना हालंगडे): स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त संपूर्ण तालुकाभर कायदेविषयक शिबिरे आयोजित करण्यात आली असून,यामधून लोकांमध्ये जागृती होणे हा मूळ उद्देश आहे. तसेच गावातील अन्य खटले गावात मिटविले तर वेळ ,पैसा वाचेल. त्यातून लोकांची प्रगती होईल, असे प्रतिपादन सांगोला येथील मुख्य न्यायाधीश पी.ए.पाटील यांनी केले.

तालुक्यातील डिकसळ येथे रविवारी सांगोला बार असोसिएशन व ग्रामपंचायतीच्या वतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमुख पाहुणे सांगोला न्यायालयातील मुख्य न्यायाधीश पी.ए.पाटील, बार अससिएशनचे अध्यक्ष ॲड. विश्वास गायकवाड सरपंच चंद्रकांत करांडे, ॲड. बी. यु. बनकर, ॲड. आनंदा बनसोडे, ॲड. हातेकर यांच्यासह अन्यमान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुढे मार्गदर्शन करताना मुख्य न्यायाधीश पी.ए.पाटील म्हणाले की आपल्या सांगोला न्यायालयात मध्यस्थ केंद्रे आहेत. त्यामधून ही खटले मिटविता येतात. यासाठी लोकन्यायाल ही आहे समजुतीने केसेस मिटविल्या तर लोकांचा वेळ,पैसा ही वाचेल. गावात शांतता नांदेल यासाठी गावातील प्रमुख मंडळींनी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. आत्ता स्वातंत्राच्या अमृत महोत्सवनिमित्त ही कायदेविषयक शिबिरे आहेत. यातून सर्व सामान्य जनतेला कायद्याचे ज्ञान मिळणार आहे, असेही न्यायाधीश पाटील यांनी शेवटी सांगितले.
प्रारंभी बार असोशियेशचे अध्यक्ष ॲड. विश्वास गायकवाड यांनी कायदेविषयक शिबिरे गावासाठी किती उपयुक्त आहेत, यातून सर्व लोकांना ज्ञान मिळणार आहे. संपूर्ण राज्यभर स्वातंत्र्या अमृत महोत्सवानिमित्त याचे आयोजन केले आहे, त्याचाच भाग म्हणून आज डिकसळमध्ये हे शिबिर घेण्यात आले. यावेळी ॲड. बी.यू.बनकर यांनी वाटपाचा कायदा,ॲड.हातेकर यांनी ७/१२व ८अ याविषयी तर ॲड. ए.के. कुलाळ यांनी रस्ता केसेस याविषयी सविस्तर माहिती सांगितली, यावेळी खरेदी-विक्री संघाचे संचालक तुकाराम भूसनर, पोलिस पाटील अनिल कुलकर्णी, ग्रामसेवक सुरेश फासे,उपसरपंच रणजित गंगणे, मधुकर करताडे, अशोक करताडे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,याकार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. आनंदा बनसोडे यांनी तर आभार सरपंच चंद्रकांत करांडे यांनी मानले.




