ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारणशेतीवाडी
Trending

सांगोला तालुक्यातील 103 गावांत 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी

तहसील कार्यालयाचा महसूल विभागाकडे प्रस्ताव

Spread the love

पावसाने ओढ दिल्याने तालुक्यात यंदा शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार असल्याने सांगोला तालुक्यातील सर्वच गावांमधील पिकांचे सर्व्हे करून त्या गावांमध्ये पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी घोषित करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाकडून लावून धरण्यात आली होती. गडचिरोली येथे झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनात याबाबतचा ठराव करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी हा ठराव मांडला होता.

सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात जून 2022 मध्ये पेरणी योग्य पाऊस न पडल्याने खरिपाची उशिरा पेरणी झाली. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळात पावसात खंड पडल्याने पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात खुंटली होती. परिणामी यंदा सांगोला तालुक्यातील शेती उत्पादन घटणार आहे. या प्राप्त परिस्थितीचा विचार करून सांगोला तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील 103 गावांमध्ये पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी घोषित करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा महसूल विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते तथा पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. गडचिरोली येथे झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनात याबाबतचा ठराव मांडण्यात आला होता.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यंदा सांगोला तालुक्यात जून 2022 मध्ये पेरणी योग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे तालुक्यात उशिरा पेरणी झाली. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळात पावसाने पुन्हा एकदा ओढ दिली. त्यामुळे पावसात खंड पडल्याने पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात खुंटली आहे. परिणामी यंदा सांगोला तालुक्यातील शेती उत्पादन घटणार आहे. या प्राप्त परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने तालुक्यातील 103 गावांमध्ये पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी घोषित करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्याबाबतचा अहवाल सांगोला तहसीलदार अभिजित पाटील यांनी जिल्हा महसूल विभागाकडे मान्यतेसाठी सादर केला आहे.

नेमका काय होणार फायदा
तालुक्यात पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी घोषित झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना तसेच तालुकावासियांना त्याचा फायदा होणार आहे. जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सूट, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती अनुज्ञेय असतात.

कोणत्या सवलती मिळू शकतात

  • जमीन महसूलात सूट
  • सहकारी कर्जाचे पुनर्गठण
  • शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
  • कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सूट
  • शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
  • रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
  • आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर
  • टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे

शेकापचा पाठपुरावा
पावसाने ओढ दिल्याने तालुक्यात यंदा शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार असल्याने सांगोला तालुक्यातील सर्वच गावांमधील पिकांचे सर्व्हे करून त्या गावांमध्ये पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी घोषित करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाकडून लावून धरण्यात आली होती. गडचिरोली येथे झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनात याबाबतचा ठराव करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी हा ठराव मांडला होता.

त्यांनी याबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून तहसील कार्यालयाकडून महसूल विभागाकडे मान्यतेसाठी हा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी कामगार पक्ष हा शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आला आहे. आबासाहेबांनी दिलेल्या शिकवणीनुसार आम्ही वाटचाल करत आहोत. सांगोला तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. नैसर्गिक संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना, तालुकावासियांना धीर देण्यासाठी आम्ही तालुक्यात पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी घोषित करण्याची आग्रही मागणी केली होती. त्यास यश आले आहे. प्रशासनाने हा निर्णय तातडीने अंमलबजावणीस्तव हाती घ्यावा, ही विनंती आहे. – डॉ. बाबासाहेब देशमुख (प्रदेश अध्यक्ष पुरोगामी युवक संघटना)

कोणत्या गावांत पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी घोषित करण्यात येणार आहे त्याचा तक्ता पुढीलप्रमाणे


हेही वाचा

सभा शिवसेनेची, टीका बापूवर.. हवा मात्र शेकापची

“शहाजीबापूंचं घर अंधारेंना खुपतंय, त्यांना कावीळ झालीय!”

..तर शहाजीबापूंचा स्टॉक थर्टी फर्स्टच्या आधीच संपेल

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका