ताजे अपडेट
Trending

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या अनेक मागण्यास शासनाकडून निधीची तरतूद

Spread the love

सांगोला तालुक्यात डाळिंब व द्राक्ष या पिकांपासून वाईन तयार करून शेतकऱ्यांना चार पैसै ज्यादा मिळावेत या साठी या भागात वाईन उद्योग सुरू करावा अशी मागणी केली असता शासनाने त्यावर सकारात्मकता दर्शवली असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दूधासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाला प्रति लिटर १० रूपये अनुदान देण्यात यावी अशी मागणी पावसाळी अधिवेशनात केली असता राज्य सरकारने अनुदान देण्याचे मान्य केलेले असून आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश आले आहे. त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून ग्रामीण भागातील दळणवळण विस्कळीत झाल्याने आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी निधीची मागणी केलेली होती त्यास पुरवणी मागण्या मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. सांगोला तालुक्यात डाळिंब व द्राक्ष या पिकांपासून वाईन तयार करून शेतकऱ्यांना चार पैसै ज्यादा मिळावेत या साठी या भागात वाईन उद्योग सुरू करावा अशी मागणी केली असता शासनाने त्यावर सकारात्मकता दर्शवली असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ६१ हजार ४६० हेक्टर जमिनीवर डाळींब पिकाचे उत्पादन घेतले जाते. राज्यात डाळींबाचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची विशेष ओळख आहे.

सोलापूर जिल्ह्यात केंद्रीय डाळींब संशोधन केंद्र मंजूर करून २००५ पासून कार्यान्वित आहे, परंतु संशोधन केंद्रामध्ये आजतागायत डाळींबाचे नवीन वाण निर्माण करण्याबाबत अपयशी ठरलेले आहे. तरी केंद्रीय डाळींब संशोधन केंद्रात नवीन डाळींब वाण निर्मिती करण्यासाठी शासनाने बीज परीक्षण प्रयोगशाळा बळकटीकरण करण्याकरिता आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी निधीची मागणी केली होती त्यास शासनाने मान्यता दिली असून लवकरच त्याकरिता निधी उपलब्ध होणार आहे. सध्या सांगोला शहरात भूमिगत गटाराचे काम सुरु असून त्यामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी केली होती त्यास पुरवणी मागण्या मध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

सांगोला येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय हे भाडे तत्वावर असून याठिकाणी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध असून, प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली होती त्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर सांगोला ग्रामीण रूग्णालय येथील मुख्य इमारतीचे नुतनीकरण व अधिकारी कर्मचारी निवासस्थानाचे बांधकाम करण्यासाठी तसेच अंतर्गत रस्ते व संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे तरी सांगोला ग्रामीण रूग्णालय येथील मुख्य इमारतीची दुरूस्ती व कर्मचारी निवासस्थानाचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी केली होती या मागणीची दखल घेत शासनाने निधीची तरतूद केली आहे.

सांगोला मतदार संघातील विविध विकासकामांची मुद्देसुद मांडणी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचेकडून केली जात आहे. प्रचारादरम्यान मतदारांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण मांडणी ते विधिमंडळात करत आहेत. पहिल्यांदाच निवडुन आलेल्या आमदाराकडून असे सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे व जनतेशी निगडित असणारे प्रश्न मांडले जात असून त्यावर सकारात्मक कार्यवाही होत असल्यामुळे सांगोला मतदारसंघातील जनतेकडून आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे कौतुक होत आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका