नागपुरात आ. बाबासाहेब देशमुख आंदोलकांच्या मदतीला धावले
पोलिस पाटील, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा

नागपूर : विशेष प्रतिनिधी
नागपूर येथे राज्यातील पोलीस पाटील यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन चालू असून या आंदोलनस्थळी आज सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख भेट देवून या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख म्हणाले की, पोलीस पाटील अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती होवून या अधिनियमाचे काटेकोरपणे अमंलबजावणी व्हावी. तसेच पोलीस पाटील यांचे नुतणीकरण कायमस्वरुपी बंद करावे. याचबरोबर पोलीस पाटील यांची वयोमर्यादा ६० वर्षावरुन ६५ वर्षे करावी तसेच सन २०१९ पासून राज्यातील पोलीस पाटील यांच्या वारसांना अनुकंपा कायदा लागू करण्यात यावा. पोलीस पाटील यांना सेवानिवृत्ती नंतर एकरकमी २० लाख रुपये मिळावेत तसेच पोलीस पाटील यांच्या करिता कल्याण निधी स्थापन करावा.
अंशकालिन गृह विभाग व महसूल विभागामध्ये पद भरतीमध्ये ज्यांची किमान १० वर्षे सेवा पूर्ण झाली आहे, त्यांना समांतर आरक्षण मिळावे.तसेच अतिरिक्त पदभार असलेल्या गावामध्ये २५% अतिरिक्त मानधन मिळावे.पोलीस पाटील यांचे मानधन व प्रवास भत्ता प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत मिळावा.
आणि पोलीस पाटील यांना विमा कवच लागू करावे. राज्यशासनाने तातडीने या आंदोलनाची दखल घेऊन सर्व मागण्या त्वरित मान्य करून पोलिस पाटील संघटनेला न्याय द्यावा..
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा
———–
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी राज्य शासनाकडे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या सर्व मागण्या त्वरित मान्य करून त्यांना न्याय द्यावी अशी मागणी केली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार व मानधनात दुप्पट वाढ मिळाली पाहिजे यासाठी हे आंदोलन चालू असून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील एक लाख ७५ हजार युवक आणि युवतींना खाजगी व शासकीय आस्थापनेमध्ये ११ महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून प्रशिक्षण पूर्ण करून पुन्हा हे युवक आणि युवती प्रशिक्षित बेरोजगार होण्याची वेळ त्यांच्यावर शासनाच्या नाकर्त्या धोरणामुळे आली.म्हणून प्रशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींना त्यांच्या शैक्षणिक क्षमतेनुसार विविध शासकीय आस्थापनेमध्ये त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे व मानधनांमध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे अशी मागणी यावेळी बोलताना आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी राज्य सरकार कडे केली.





