ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण

गद्दारांकडे आम्ही लक्ष देत नाही : अदित्य ठाकरेंचा शहाजीबापूंवर निशाणा

Spread the love

सांगोला/ नाना हालंगडे
अतिवृष्टीमुळे राज्यात खूप भयानक परिस्थिती उद्भवली आहे. असे असताना मंत्री आणि नेते शिव्या देण्यात व्यस्त आहेत, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली. आमची बांधिलकी शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांसोबत आहे. असे सांगतानाच आम्ही गद्दार लोकांकडे लक्ष देत नाही असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यातील मंत्रीमंडळाची अजुन बैठक झाली नाही. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यासाठी अजुन वेळ मिळाला नाही . राज्यात सध्या केवळ राजकारण सुरु आहे परंतु शेतकऱ्याच्या बांधावर अजूनही कोणी आले नाही याचे मला दुःख वाटत असून मी फुटून गेलेल्या गद्दारांकडे जास्त लक्ष देत नसल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी सांगोला तालुक्यातील संगेवाडी येथे लगावला .

पाहा व्हिडिओ

सांगोला तालुक्यातील संगेवाडी व मेडशिंगी येथील नुकसानग्रस्त भागाची माजी पर्याटन मंत्री व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज बुधवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सव्वाबारा वा . पाहणी केली.

यावेळी त्यांचेसोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे , जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ , शिवसेना नेते लक्ष्मण हाके , युवा सेना विस्तारक उत्तम ऐवळे , जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे , युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे , सुर्यकांत घाडगे , कमरुद्दीन खतीब यांच्यासह शिवसैनिक , युवा सैनिक , पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी संगेवाडी व मांजरी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन यावेळी आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली .

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली . आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यावेळी धीर देण्याचे काम केले . यावेळी शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी आदित्य ठाकरे यांचेकडे केली.

प्रशासनाने सरसकट पंचनामे केले नाहीत त्यामुळे आम्हाला मदत मिळत नाही संगेवाडी शिवारातील सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत व सरसकट शासनाकडून मदत मिळावी यावेळी आदित्य ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा देखील समजून घेतल्या.यावेळी तहसीलदार अभिजित पाटील , कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी संगेवाडी , मांजरी येथे मोठा जनसमुदाय दिसून आला.

सांगोला शहरातही जंगी स्वागत करण्यात आहे. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्हहार अर्पण करण्यात आला.फटाक्याच्या आतषबाजीने शहर दूमदुमुन निघाले.त्यानंतर सांगोला सुत गिरणीवर स्व.गणपतरावजी देशमुख यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.

यावेळी सांगोला येथील स्व.आबासाहेब यांच्या प्रेरणा स्थळाला भेट दिली. यावेळी चंद्रकांत देशमुख,राज्य चिटणीस डॉ.बाबासाहेब देशमुख, प्रा.लक्ष्मण हाके, यावेळी माजी उपसभापती नारायण जगताप,ॲड.सचिन देशमुख,विष्णू देशमुख,अमोल खरात,सुरेश माळी उपस्थित होते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका