साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक जयंत पवार यांचे निधन

‘काय डेंजर वारा सुटलाय’ नाटकाने रचला होता इतिहास

Spread the love

मुंबई (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध साहित्यिक तथा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक जयंत पवार यांचे निधन झाले आहे.

जयंत पवार यांच्या जाण्याने एक निर्भिड पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक गमावला आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तेच नाटक नंतर निर्माते संतोष कोचरेकर यांनी कल्पना कोठारी आणि उदय कुलकर्णी यांस सहनिर्माता म्हणून घेऊन आपल्या ‘महाराष्ट्र रंगभूमी’तर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले.

२०१४ सालच्या जानेवारी महिन्यात १० ते १२ या तारखांना महाड येथे झालेल्या १५व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार हे अध्यक्ष होते.

जयंत पवार यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ’फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी मिळाला.

अधांतर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक), दरवेशी (एकांकिका), पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह), बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़ाषाविषयक), माझे घर, वरनभातलोन्चा नि कोण नाय कोन्चा (कथासंग्रह), वंश, शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक), होड्या (एकांकिका) या त्यांच्या कलाकृती सर्वांच्या स्मरणात राहतील.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका