थिंक टँक स्पेशल
Trending

दीपकआबांनी मुख्यमंत्र्यांसह विविध खात्यांच्या मंत्र्यांची घेतली भेट

Spread the love

दीपकआबांनी मागील तीन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध खात्यांच्या मंत्र्यांची भेट घेतली. सांगोला तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली. विविध प्रश्नांबाबत त्यांनी मंत्री महोदयांना निवेदने दिली आहेत.

नागपूर : विशेष प्रतिनिधी
माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील हे नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित आहेत. मागील तीन दिवसांत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध खात्यांच्या मंत्र्यांची भेट घेतली. सांगोला तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली.

नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील हेही या अधिवेशनात उपस्थित आहेत. दीपकआबांनी मागील तीन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध खात्यांच्या मंत्र्यांची भेट घेतली. सांगोला तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली. विविध प्रश्नांबाबत त्यांनी मंत्री महोदयांना निवेदने दिली आहेत.

आजी-माजी आमदारांकडून नेटाने पाठपुरावा

एका बाजूला विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे सभागृहात थेट प्रश्न मांडत आहेत. तर दुसरीकडे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हेही मुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा करत आहेत. आ. बाबासाहेब व दीपकआबा या आजी-माजी आमदारांकडून सांगोला मतदारसंघाच्या विकासासाठी नेटाने पाठपुरावा सुरू असल्याचे दिसून येत आहे.

खास व्हिडिओ 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका