
सांगोला : प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभा पंढरपूर शाखा यांच्यावतीने शेतकरी कामगार पक्षाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. महूद येथे झालेल्या जाहीर सभेत शेकापचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा पंढरपूर शाखेचे राज वाघमारे (तालुकाध्यक्ष), बिरदेव केंगार (तालुका उपाध्यक्ष), अरूण कांबळे (ता.सचिव), शिवाजी शिंदे (तालुका संघटक) यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा पंढरपूर शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षावर विश्वास ठेवून पाठिंबा दिल्याबद्दल डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भारतीय बौद्ध महासभा पंढरपूर शाखेचे आभार मानले.
भाळवणी गटात मताधिक्य देणार
भाळवणी जिल्हा परिषद गट हा सांगोला विधानसभा मतदारसंघात महत्त्वाचा मानला जातो. या गटात बौद्ध इतर वंचित समजघटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी कामगार पक्षाने आजवर फुले शाहू आंबेडकर विचारधारा जोपासण्याचे काम केले आहे. त्यामुळेच त्यांना हा पाठिंबा दिला असून भाळवणी गटात मताधिक्य देणार असल्याची माहिती बिरदेव केंगार (तालुका उपाध्यक्ष) यांनी दिली.



