राजकारण
Trending

हाती मशाल घेऊन आबांची जवळ्यात रॉयल एन्ट्री

Spread the love

सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी हाती मशाल घेऊन जवळा गावात रॉयल एन्ट्री केली. त्यांच्या स्वागताला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. दीपकआबांना खांद्यावर उचलून घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावातून मिरवणूक काढली. आपल्या लाडक्या नेत्याला पाठिंबा देण्यासाठी अख्खे गाव गोळा झाले होते.

गावाच्या वेशीपासून त्यांच्या स्वागत मिरवणुकीला सुरुवात झाली. हलगीच्या कडकडाटात, फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले. एकच वादा दीपकआबा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी शिवसेना उध्दव ठाकरे पक्षात प्रवेश केल्यापासून त्यांच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य संचारले आहे. एवढी वर्षे इतरांसाठी काम केले. आता आबांना विजयी करायचे या ईर्षेने कार्यकर्ते पेटले आहेत. मागील आठवड्यात दीपकआबा साळुंखे – पाटील हे शिवसेना पक्षात प्रवेश केल्यापासून मुंबई येथे होते. मंगळवारी ते सांगोला तालुक्यात आले.

जवळा गावात त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. दुपारपासूनच वाड्या वस्त्यावरील कार्यकर्ते जवळा गावात गर्दी करू लागले होते. सायंकाळी दीपकआबा साळुंखे – पाटील यांचे जवळा गावात आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

गावाच्या वेशीपासून त्यांच्या स्वागत मिरवणुकीला सुरुवात झाली. हलगीच्या कडकडाटात, फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले. एकच वादा दीपकआबा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

सर्वच पक्षांत चुरस
शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून दीपकआबा साळुंखे – पाटील तर शेतकरी कामगार पक्षाकडून डॉ. बाबासाहेब देशमुख हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एरव्ही भाई गणपतराव देशमुख आणि शहाजीबापू पाटील यांच्यात सामना होत होता. या निवडणुकीत प्रथमच तिरंगी चुरशीचा सामना पहावयास मिळणार आहे.

जवळा गावात प्रचंड उत्सुकता
माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी यावेळेस कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी यासाठी मोठा दबाव आहे. कार्यकर्त्यांच्या प्रचंड आग्रहाखातर दीपकआबा साळुंखे – पाटील हे या निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून दंड थोपटून उभे आहेत.


सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

खा. संजय राऊतांकडून दीपकआबांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत

“आबा, मशालीने गद्दारांच्या बुडाला चटके द्या”

डॉ. बाबासाहेब देशमुखच शेकापचे उमेदवार

सांगोल्यातून शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी जाहीर

शेकापकडून आज विराट शक्तीप्रदर्शन!

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका