ताजे अपडेट
Trending

कोळेतील अस्थिविहारास रिपाइं प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांची भेट

Spread the love

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी या स्मारकाची पाहणी केली. केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख यांचे अभिनंदन केले.

सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील कोळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार स्मारकास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी भेट दिली. यावेळी अस्थिविहारास त्यांनी चांदीचा कलश भेट दिला. कोळा भागातील युवा नेते ॲड. सचिन देशमुख यांच्या प्रयत्नातून हे अस्थिविहार साकारण्यात आले आहे.

या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा अध्यक्ष आरपीआय, करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला तालुकाध्यक्ष आरपीआय, महाराष्ट्र सरचिटणीस आरपीआय, विभागीय अध्यक्ष तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी फुले साहेब, आरपीआय सांगोला तालुका अध्यक्ष खंडू सातपुते, कोळा ग्रामविकास अधिकारी खटकाळे, माजी पंचायत समिती सभापती संभाजी तात्या आलदर, माजी पंचायत समिती सदस्य सिताराम सरगर, पैलवान हरिभाऊ सरगर, जितेंद्र बनसोडे, विक्रम शेलके, किरण तात्या धाइंजे, मिलिंद सरतापे, दामोदर साठे,

युवक नेते संदीप पाटील, रफिक भाई तांबोळी, सोपान कोळेकर, तुकाराम दादा आलदर, डॉक्टर सादिक पटेल, सांगोला तालुका सहकारी सूतगिरणीचे संचालक दिलीप देशमुख, अर्बन बँकेचे चेअरमन आप्पासाहेब सरगर यांच्यासह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सोसायटी सदस्य, सूतगिरणीचे सदस्य, साखर कारखान्याचे संचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी या स्मारकाची पाहणी केली. केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख यांचे अभिनंदन केले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका