..तर शहाजीबापूंचा स्टॉक थर्टी फर्स्टच्या आधीच संपेल
सुषमा अंधारेंनी सांगोल्यात धू धू धुतले

सुषमा अंधारे यांनी एक एक पिसे उपसून काढली. येत्या निवडणुकीत शहाजीबापूची विकेट नक्की असल्याचे सांगितले. शहाजीबापू यांचा जुना व्हिडिओ लावत सुषमा अंधारे म्हणाल्या की, “मी शहाजीबापूंना एवढेही टेन्शन देणार नाही की त्यांचा सर्व स्टॉक थर्टी फर्स्टच्या आधीच संपून जाईल. कारण त्यादिवशी ड्राय डे असतो.”
थिंक टँक / नाना हालंगडे
“सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी अनेक पक्ष बदलले. ज्या पक्षात जाईल तिथल्या नेत्याला बापाचा दर्जा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वयाने लहान असतानाही शहाजीबापू त्यांना वडील मानतात. ही काय भानगड आहे?” असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी एक एक पिसे उपसून काढली. येत्या निवडणुकीत शहाजीबापूची विकेट नक्की असल्याचे सांगितले. शहाजीबापू यांचा जुना व्हिडिओ लावत सुषमा अंधारे म्हणाल्या की, “मी शहाजीबापूंना एवढेही टेन्शन देणार नाही की त्यांचा सर्व स्टॉक थर्टी फर्स्टच्या आधीच संपून जाईल. कारण त्यादिवशी ड्राय डे असतो.”
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या जाहीर सभेचे आयोजन सांगोला येथे रविवारी करण्यात आले होते. या सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या सभेत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी शहाजीबापू पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार, इंदुरीकर महाराज आदींवर सडेतोड टीका केली. सुषमा अंधारे यांनी स्टेजवरच लावलेल्या भव्य दिव्य अशा एलईडी स्क्रीनवर व्हिडिओ तसेच फोटो डिस्प्ले करून विरोधकांचा चांगला समाचार घेतला.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, “स्वातंत्र्यवीर सावरकर, संभाजी भिडे गुरुजी यांनी वारकरी परंपरेवर कठोर टीका करत खिल्ली उडविली आहे. त्यावर भाजप नेते कधी बोलणार? आशिष शेलार माझा राजीनामा मागत आहेत. मी काय कॅबिनेट मंत्री आहे का?”
भाजपच शिंदेंचे राजकारण संपवेल
भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न केला आहे. ते आता मुख्यमंत्री यांना विविध प्रकरणात अडकवून संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. भूखंड घोटाळ्याचा प्रश्न भाजप आमदारांनीच उपस्थित केला होता. त्यामुळे भाजपच एकनाथ शिंदे यांना पदावरून पायउतार करेल हे सिद्ध होते.”
तर शहाजीबापू पहिल्यांदा उडी मारतील
सुषमा अंधारे म्हणाल्या की, “उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळविण्याचा भाजपचा हेतू आता सफल झाल्याने त्यांना शिंदे गटाची गरज उरलेली नाही. शिंदे गटातील किमान वीसहून अधिक आमदार फुटून भाजपमध्ये जावू शकतात. असे झाले तर भाजपमध्ये उडी मारणारे पहिले आमदार शहाजीबापू पाटील असतील” असा खळबळजनक दावा सुषमा अंधारे यांनी केला.
सांगोल्यावर आबासाहेबांचे उपकार
“शेकापचे आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे सांगोला तालुक्यावर अनंत उपकार आहेत. तब्बल अकरा वेळा आमदार होऊनही आबासाहेब यांनी इस्टेटी तयार केल्या नाहीत. सांगोला तालुक्यातील दुष्काळ हटविण्याचे मोठे कार्य भाई गणपतराव देशमुख यांनी केले आहे. स्वतःच्या पत्नीला दोनशे रुपयांनी साडी घेऊ न शकणारे शहाजी बापू पाटील हे आमदार बनल्यानंतर दोन वर्षातच एक एकर जागेत बंगला बांधत आहेत. ही आश्चर्याची बाब आहे.”
यावेळी सुषमा अंधारे यांनी शहाजीबापू पाटील यांचे मित्र तथा माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांनाही लक्ष्य केले. रफिक नदाफ हे शहाजीबापूंच्या जवळचे मित्र असूनही शहाजीबापू हे त्यांना न सांगता गुवाहाटीला गुपचूप गेले. सांगोल्यात टक्केवारीचे राजकारण चालते असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
सुषमा अंधारे यांनी शहाजीबापू पाटील यांच्या दबावाच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला. त्या म्हणाल्या की, “डीवायएसपी बापूंच्याच, तहसीलदार बापूंचेच, बीडीओबी बापूंचेच. या अधिकाऱ्यांवर किती प्रेशर असेल असेल” असे म्हणत सुषमा अंधारे यांनी खळबळ उडवून दिली.
या सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या सभेत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी शहाजीबापू पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार, इंदुरीकर महाराज आदींवर सडेतोड टीका केली. सुषमा अंधारे यांनी स्टेजवरच लावलेल्या भव्य दिव्य अशा एलईडी स्क्रीनवर व्हिडिओ तसेच फोटो डिस्प्ले करून विरोधकांचा चांगला समाचार घेतला.
सुषमा अंधारेंनी सांगोल्यात धू धू धुतले (पाहा व्हिडिओ)



