ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळे फासले

छ.संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप

Spread the love

(थिंक टँक न्युज नेटवर्क/ एच नाना) ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या चेहऱ्याला काळं फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजी ब्रिगेडनं गिरीश कुबेर यांच्या चेहऱ्याला काळं फासलं आहे. संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करत हे काळं फासलं आहे.

नाशिकमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रविवारी दुपारच्या सुमारास परिसंवाद होणार होता. मुख्य गेटजवळ गिरीश कुबेर यांच्या चेहऱ्यावर काळं फासण्यात आलं. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या दोन लोकांनी पत्रकंही भिरकावली. छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध असं या पत्रकात लिहिण्यात आलं होतं.

पोलिसांनी काळं फासणाऱ्य़ा संभाजी ब्रिगेडच्या दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे. मात्र या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो. अशा प्रकारे व्यक्त होणं हे चुकीचं आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो. सुंदर चाललेल्या संमेलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही’, जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली.

या घटनेनंतर गिरीश कुबेर परिसंवादासाठी व्यासपिठावर उपस्थित होते. तसंच साहित्य संमेलनातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका