ताजे अपडेट
Trending

शेकापचा कॉर्नर सभांचा धडाका

Spread the love

सांगोला : विशेष प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी कॉर्नर सभांचा धडाका लावला आहे. आज गुरुवारी दिवसभरात एकूण १४ सभा तालुक्यात होत आहेत.

महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख तालुक्यातील विविध गावांमध्ये आपल्या प्रचार सभा घेत आहे. त्यांच्या समवेत त्यांचे बंधू अनिकेत देशमुख हे प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. त्यांच्या विविध गावात होत असलेल्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत असताना दिसत आहे.

सकाळी आठ ते दहा या वेळेत बामणी या गावात सभा होईल. मांजरी गावामध्ये सकाळी नऊ ते 11 या वेळेत सभा होईल. संगेवाडी गावामध्ये सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत सभा होईल. मेथवडे गावात सकाळी 11 ते दुपारी एक, देवळे गावात दुपारी बारा ते दोन, सावे गावात दुपारी एक ते दोन, वाढेगाव मध्ये दुपारी तीन ते चार, राजापूर येथे दुपारी तीन ते चार, मेडशिंगी गावामध्ये दुपारी चार ते सहा, आलेगाव मध्ये सायंकाळी पाच ते सात, वाणी चिंचाळे गावामध्ये सायंकाळी सहा ते आठ, वाकी घेरडी गावामध्ये सायंकाळी सात ते नऊ, तरंगेवाडी गावामध्ये रात्री नऊ ते दहा या प्रमाणे सभांची नियोजन ठरले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका