सोलापूर जिल्हा माहिती अधिकारीपदी सुनील सोनटक्के रुजू

Spread the love

सोलापूर : सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सुनील सोनटक्के यांनी आज घेतला. श्री. सोनटक्के यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाचाही पदभार आहे.

यावेळी माहिती सहायक धोंडिराम अर्जुन, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

श्री. सोनटक्के यांनी यापूर्वी जळगाव माहिती अधिकारी, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी, लातूर जिल्हा माहिती अधिकारी, लातूर उपसंचालक पदाचा अतिरिक्त पदभार यशस्वीपणे सांभाळला आहे. मागील विधानसभेच्या निवडणूक कालावधीत श्री. सोनटक्के यांनी दिड महिना सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार सांभाळला आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका