
सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
महाविकास आघाडी इंडिया, अलायन्स, शेतकरी कामगार पक्ष तसेच असंख्य राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विविध समाज घटकांनी पुरस्कृत केलेले अधिकृत उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ आज रविवारी सायंकाळी सहा वाजता महूद बुद्रुक येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महूद बुद्रुक येथील जुने बाजार पटांगण अंबिका चौक येथे ही विराट सभा होणार आहे. या सभेसाठी हजारोंचा जनसागर उसळणार आहे.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध जिल्हा परिषद गटातील सर्वच गावे त्यांनी पिंजून काढली आहेत. सर्वच गावांमध्ये कॉर्नर बैठका तसेच सभा घेऊन त्यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन मांडले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे महूद हे गाव आहे. या भागात त्यांना मानणारा वर्ग असला तरी भाई गणपतराव देशमुख यांच्या शेतकरी कामगार पक्षाचा या गावात दबदबा आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज या गावात आहे. आज सायंकाळी सहा वाजता महूद गावामध्ये विराट सभा आयोजित करण्यात आली आहे.
मतदारसंघात झालेल्या सर्वच सर्वांना उदंड असा प्रतिसाद मिळाला आहे. कोळा येथे काल शनिवारी झालेल्या जंगी सभेला हजारो बहाद्दर कार्यकर्ते उपस्थित होते. जवळा, भाळवणी, घेरडी येथे झालेल्या जाहीर सभांना विरोधकांच्या उरात धडकी भरवणारी गर्दी उसळली होती.
त्यांच्या या प्रचार सभांमध्ये डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या समवेत त्यांचे बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख, माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सौ. शितल देवी मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडी घटक पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाची असंख्य नेतेमंडळी उपस्थित होती. काल कोळा येथे झालेल्या विराट सभेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घराण्यातील वंशज भूषण सिंह होळकर यांनी उपस्थिती लावून स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचे उर्वरित स्वप्न साकार करण्यासाठी आणि सांगोला तालुका पुन्हा एकदा शांतता प्रिय सामाजिक सलोखा राखणारा घडवण्यासाठी बाबासाहेब देशमुख यांना निवडून द्यावे असे आवाहन केले होते.
बापूंच्या इलाख्यात हाबडा
शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे महूद हे गाव आहे. या भागात त्यांना मानणारा वर्ग असला तरी भाई गणपतराव देशमुख यांच्या शेतकरी कामगार पक्षाचा या गावात दबदबा आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज या गावात आहे. आज सायंकाळी सहा वाजता महूद गावामध्ये विराट सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.




