ताजे अपडेट
Trending

रासप अन् शेकाप घेरडीत विक्रम करणार

सोमाआबा मोटे यांचा निश्चय

Spread the love

घेरडी गटातील दोन्ही गणामध्ये यासाठी वातावरण ही चांगले आहे.त्यामुळे रासप ही संपूर्ण ताकतीने या निवडणुकीत यांना मदतीचा हात देणार आहे.डॉ. बाबासाहेब हे एक तरुण तडफदार,विकासाभिमुख असे नेतृत्व आहे.त्यांच्याकडे तालुक्याचे व्हिजेन आहे.त्यामुळे मी ही मोठ्या ताकदीने उतरलो आहे.

सांगोला/ नाना हालंगडे
घेरडी जिल्हा परिषद गटात शेकाप अन् रासप एकत्रित काम करणार असून शेकापचे अधिकृत उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना या गटातून विक्रमी मतांचे दान करून विधानसभेत पाठविनार असल्याचे रासपचे राज्य सरचिटणीस सोमाआबा मोटे यांनी सांगितले.तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने डॉ.बाबासाहेब देशमुख यांना जाहीर पाठिंबा ही देण्यात आलेला आहे.यावेळी घेरडी जिल्हा परिषद गट तालुक्यात विक्रमच प्रस्थापित करणार असल्याचे,सोमाआबा मोटे यांनी थिंक टँकशी बोलताना सांगितले.

मोटे म्हणाले की, सांगोला तालुक्यात तिरंगी लढत लागली असली तरी, खरी लढत ही डॉ.बाबासाहेब देशमुख आणि सेनेचे शहाजीबापू पाटील यांच्यातच होणार असून डॉ बाबासाहेब देशमुख हे पाच हजारांहून अधिक मताने या गटातून निवडून येणारं आहेत. घेरडी गटात १४ गावे असून ३५ हजारांच्या आसपास मतदान आहे. आता या निवडणुकीत आमच्या दोन्हीसह अन्य घटक पक्षांची साथ मिळाल्याने डॉ.देशमुख यांचा विजय जवळ जवळ निश्चितच मानला जात आहे. आता फक्त जास्तीत लीड कसे देता येईल यांची जुळणी करणे चालू आहे.

सेनेच्या दोन्ही ही उमेदवारांचे काम शून्य आहे.तर उबाठा गटाचे उमेदवार हे नवखे आहेत.त्यांचे राजकारण वेगळ्या पद्धतीचे आहे.त्यामुळे डॉ.बाबासाहेब यांच्यासाठी ही निवडणूक अगदी सोपी आहे.

घेरडी गटातील दोन्ही गणामध्ये यासाठी वातावरण ही चांगले आहे.त्यामुळे रासप ही संपूर्ण ताकतीने या निवडणुकीत यांना मदतीचा हात देणार आहे.डॉ. बाबासाहेब हे एक तरुण तडफदार,विकासाभिमुख असे नेतृत्व आहे.त्यांच्याकडे तालुक्याचे व्हिजेन आहे.त्यामुळे मी ही मोठ्या ताकदीने उतरलो आहे.

विकासासाठीच पाठिंबा
सांगोला तालुक्याचा सर्वागीण विकास शेकापक्षच करू शकतो, हे आम्ही ५० वर्षापासून पाहत आलेलो आहे.पण मागील पाच वर्षात या दोघांजणांनी जो काही बाजार मांडला होता. त्यामुळे राज्यात नाच्चकी झाली. तालुक्यातील शेतीच्या, पिणाच्या पाण्याच्यासह अन्य योजना स्व. भाई आबासाहेबांनी मार्गी लावल्या.त्यावरही ही मंडळी राजकारण करीत आहेत. स्वतःला आम्हीच वारसदार आहे,अशा बाता मारीत आहेत. यांचे हे ढोंगी राजकारण तालुक्याला माहीत आहे.त्यामुळे तालुक्याच्या सर्वागीण विकासासाठी आम्ही पाठिंबा देत आहे.

कोण आहेत सोमाआबा मोटे?

घेरडी जिल्हा परिषद गटातील तरुण,तडफदार एक वेगळेच व्हिजेन असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य सरचिटणीस पदावर काम करणारे सोमाआबा मोटे खमके नेतृत्व आहे.माजी मंत्री महादेव जानकर यांचे खंदे समर्थक आहेत.घेरडी गटाबरोबर त्यांची संपूर्ण तालुकाभर वेगळीच ओळख आहे. सध्या जिल्हा नियोजन समितीचे हे सदस्य असून तालुक्याला निधी आणण्यासाठी हेही शयार्तीने पर्यंत करतात.मोठ्या प्रमाणात युवक संघटन असून,सर्वच समाज मनामध्ये यांना मानाचे स्थान आहे.

राजकारणाला समाजकारणाची जोड आज आबा मोटे यांचे समाजकारण अन् शैक्षणिक कार्य वाखणाण्याजोगे आहे.त्यालाच राजकारणाची किनार साजेशी अशीच आहे.त्यामुळे यांचे तालुक्यात नाव आहे.कोणतेही काम चुटकीसरशी करणे अन् मिळवून देणे हेच त्यांचे ध्येय.त्यामुळे सोमा मोटे तालुक्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असतात.आता तर डॉ.बाबा साहेब यांना जाहीर पाठिंबा देवून,आमदार करण्याचा त्यांनी विडाच उचलला आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका