थिंक टँक स्पेशल
Trending

आ. बाबासाहेबांनी करून दाखवले

फुले चौक ते भोपळे रोडचे अखेर डांबरीकरण

Spread the love

भुयारी गटार योजनेसाठी ठेकेदाराने जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने पाइपलाइनचे काम सुरू केले होते. पाइप टाकल्यानंतर रस्त्यावर खडी टाकून ठेवली होती, मात्र रोलिंग केल्यानंतरही डांबरीकरण न झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणी येत होत्या. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी यासंदर्भात दोन वेळा बैठका घेऊन तातडीने हा रस्ता डांबरीकरण करून वाहतुकीसाठी खुला करावा असा सूचना दिल्या होत्या.

सांगोला : विशेष प्रतिनिधी

नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही बराच काळ रखडलेल्या सांगोला शहरातील महात्मा फुले चौक ते भोपळे रोड रस्त्याचे डांबरीकरण अखेर करण्यात आले. व्यापारी व नागरिकांच्या सततच्या मागणीमुळे कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी दोन बैठका घेऊन प्रशासन व ठेकेदार यांच्यात समन्वय साधत कोणत्याही परिस्थीत हे काम पूर्ण कराच असे सांगितल्यामुळे ठेकेदारास हे काम करणे भाग पडले. त्यामुळे व्यापारी बांधवासह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

बंदिस्त गटार योजनेच्या ठेकेदाराकडून रस्ता खणून पाइपलाइन टाकल्यानंतर केवळ खडीकरण केले होते. गेल्या महिनाभरापासून या परिसरातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि वाहनधारकांना खडतर प्रवासाचा सामना करावा लागत होता. परिसरातील व्यापारी बांधवांनी याबाबत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची भेट घेऊन संबंधित रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी केली होती. या मागणीची दाखल घेत आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी अधिकारी व ठेकेदार यांच्या समवेत बैठक घेऊन पावसाळा सुरू होण्याअगोदर रस्त्याचे डांबरीकरण करा अशी सक्त सूचना केली होती.

भुयारी गटार योजनेसाठी ठेकेदाराने जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने पाइपलाइनचे काम सुरू केले होते. पाइप टाकल्यानंतर रस्त्यावर खडी टाकून ठेवली होती, मात्र रोलिंग केल्यानंतरही डांबरीकरण न झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणी येत होत्या. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी यासंदर्भात दोन वेळा बैठका घेऊन तातडीने हा रस्ता डांबरीकरण करून वाहतुकीसाठी खुला करावा असा सूचना दिल्या होत्या.

आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सूचनेनंतर कामाला वेग आला आणि नागरिकांच्या मागणीनुसार संपूर्ण रस्ता सुरळीत वाहतुकीसाठी सज्ज करण्यात आला असल्यामुळे व्यापारी बांधवासह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. नव्या डांबरीकरणाच्या कामामुळे महात्मा फुले चौक, भोपळे रोड व परिसरातील व्यापारी, नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

आ. बाबासाहेब देशमुख यांनी दोन बैठका घेऊन प्रशासन व ठेकेदार यांच्यात समन्वय साधत कोणत्याही परिस्थीत हे काम पूर्ण कराच असे सांगितल्यामुळे ठेकेदारास हे काम करणे भाग पडले.

महात्मा फुले चौक ते भोपळे रोड रस्ता दुरुस्तीसाठी अनेक वेळा पाठपुरावा करून देखील आमच्या मागणीची कोणी दखल घेत नव्हते. आ. डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या कानावरती ही बाब घालताच त्यांनी भोपळे रोडसह शहरातील संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यासंदर्भात दोन वेळा तातडीने त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी रस्ता डांबरीकरण करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नामुळे डांबरीकरणाचा रखडलेला प्रश्न मार्गी लागला असल्याचे व्यापारी सर्फराज तांबोळी व शंकर माने यांनी सांगितले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका