राजकारण
Trending

सांगोल्यात अपक्ष व बंडखोर उमेदवारांमुळे मुख्य उमेदवारांना धोका

नगरपालिका रणधुमाळी; ५७ जण अपक्ष रिंगणात

Spread the love

विशेष वृत्त/ डॉ.नाना हालंगडे
सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडणुकीच्या रिंगणात 11 उमेदवार उभे राहिले आहेत तर नगरसेवकाच्या 23 जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणात 103 उमेदवार राहिले आहेत. प्रभाग एक अ व प्रभाग 11 अ मध्ये अपील असल्याने सदर उमेदवारांना माघार घेण्याची मुदत 25 नोव्हेंबर रोजी तीन वाजेपर्यंत असणार आहे. उमेदवारांना चिन्ह वाटप 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे.पण एक मात्र याच निवडणूक रणसंग्रामात अपक्ष व् बंडखोरांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करून आपला प्रचार सुरू केला असून,याचा सर्वाधिक धोका मुख्य प्रवाहात उमेदवारांना होणार आहे. याची संख्या ही ५७ इतकी आहे.

या निवडणुकीत शेकाप,भाजप व दीपक साळुंखे पाटील गट यांची आघाडी झाली आहे. त्या आघाडीचे नाव अद्याप निश्चित झाले नाही.परंतु नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या कमळ चिन्हावर मारुती बनकर हे निवडणूक लढवीत आहेत. नगरसेवकांच्या 23 जागेसाठी आघाडी झाली असून त्यांच्या चिन्हाचे वाटप 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. परंतु पक्षाची चिन्ह न राहता आघाडीची चिन्ह असणार आहे.

याच निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटातर्फे आनंद माने हे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवीत असून या पक्षातर्फे 23 नगरसेवक ही धनुष्यबाण या शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी अकरा उमेदवार जरी उभे असले तरी खरी लढत भाजपाचे मारुती बनकर,शिवसेना शिंदे गटातर्फे आनंद माने व् अपक्ष विश्वेश झपके व बापू भाकरे व इतर सात उमेदवारात लढत होणार आहे.
नगरसेवकांच्या 23 जागेसाठी छाननीत 232 अर्ज मंजूर झाले होते त्यातील 129 उमेदवारांनी माघार घेतल्याने 103 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून प्रामुख्याने शेकाप,भाजप व दीपक साळुंखे पाटील यांच्या आघाडीचे 23 व शिवसेना शिंदे गटाचे 23 यांचे मध्येच होणार आहे व इतर 57 उमेदवार अपक्ष असणार आहेत.
प्रभाग एक अ मध्ये ऐश्वर्या कुंभार, मीरा धनंजय मस्के, राणी आनंदा माने ,कोमल नवनाथ शिंगाडे तर ब मध्ये राहुल इंगोले, भारत गडहिरे,मोहन बाबर रामचंद्र मदने ,नवनाथ शिंगाडे

प्रभाग दोन अ मध्ये प्रशांत धनवजीर, चंचल बनसोडे, महादेव बनसोडे, विनोद रणदिवे प्रभाग दोन ब मध्ये दिपाली इंगोले, प्रियांका देशमुख, संगीता देशमुख, पाकीजा नदाफ व वैशाली सावंत

प्रभाग तीन मध्ये समृद्धी खडतरे, शितल ठोकळे, कविता बनसोडे, गोदाबाई बनसोडे तर ब मध्ये सचिन पवार, अरुण विलास पाटील, अरुण सदाशिव पाटील, कुंदन फुलचंद बनसोडे,विजय तानाजी बनसोडे

प्रभाग चार अ मध्ये स्वाती अंकलगी, बिस्मिल्ला बागवान, आशादेवी यावलकर तर ब मध्ये संतोष इंगोले, दिलावर तांबोळी, ज्ञानेश्वर तेली,विनोद बाबर, किरण माळवे ,महेश राऊत, सुहास होनराव

प्रभाग पाच अ मध्ये काशिलिंग गावडे ,यश जाधव ,स्वप्निल नागणे ,सुरज शिंदे तर ब मध्ये नंदा गडहिरे, पूजा माने, छाया मेटकरी

प्रभाग 6 अ मध्ये तनुजा एरंडे, महेजबिन मुजावर, सीमा सरगर तर ब मध्ये सिद्धनाथ भोसले, गोविंद कोरे ,पोपट मेटकरी चैतन्य राऊत, विश्वनाथ राऊत

प्रभाग सात अ मध्ये गणेश बनकर, किरण माळवे, किशोर म्हमाणे, मोहन राऊत, सुनील सुळे तर ब मध्ये भाग्यवती सावंत, शारदा आदलिंगे, सुचिता पवार, शोभा फुले

प्रभाग आठ अ मध्ये नंदा गडहिरे, शीतल ठोकळे, शितल लादे, श्रद्धा साबळे तर ब मध्ये दिलीप जाधव, रमेश जाधव ,शोभा देशमुख, किरण बनसोडे

प्रभाग 9 अ मध्ये मोहसीन खतीब, उत्तम ढोले, आनंद दौंडे, विनोद बाबर ,जुबेर मुजावर तर ब मध्ये रेश्मा खतिब, राजनंदिनी ढाणके, दिव्यांनी दौंडे, समशाद पठाण ,सना शेख

प्रभाग 10 अ प्रिया कमलापूरकर, वैशाली झपके, स्वाती ढोले, मलिका मनेरी ,हिना मनेरी तर ब मध्ये अनिकेत काळे, चंद्रकांत चव्हाण ,महालिंग पाटणे, विवेक पाटील, समीर पाटील ,संतोष महिमकर, अमोल लऊळकर, देवराज लोखंडे

प्रभाग 11 अ मध्ये सुजाता केदार सावंत, जाकिरा तांबोळी, श्रद्धा बुरले, मेहेज बिन मुजावर, अजमुनीसा मुल्ला, अकरा ब मध्ये अनिता केदार, इंदुमती चव्हाण तर क मध्ये नितीन इंगोले ,उन्मेश खंडागळे, शकील मुजावर ,गुलामे मुस्तफा शौकत मुलानी

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका