एसटी संप; “वो बुलाते है, मगर जानेका नही”
महाव्यवस्थापक म्हणतात, सोमवारपर्यंत हजर व्हा; कामगार संपावर ठाम
कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. “वो बुलाते है, मगर कॉल उठानेका, १३ तारीख को भी कामावर जानेका नही” असे गाण्याचे स्टेटस् अनेकांनी आपल्या व्हॉट्सॲपवर ठेवले आहे.
थिंक टँक न्यूज नेटवर्क / नाना हालंगडे
एसटी महामंडळ महाव्यवस्थापकानी कामगारांना सोमवारपर्यंत हजर व्हा असे आदेश काढले आहेत. कामगार मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. “वो बुलाते है, मगर जानेका नही” असाच त्यांनी पवित्रा घेतला आहे. नव्हे तर या गाण्याचे स्टेटस् अनेकांनी आपल्या व्हॉट्सॲपवर ठेवले आहे. त्यामुळे कामगारांचे कामबंद आंदोलन मिटणार नसल्याचे दिसत आहे.

एसटी महामंडळाच्या इतिहासात सर्वाधिक काळ म्हणजे 35 दिवसाहून अधिक चाललेल्या संपामुळे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. जरी पगारवाढ केली असली तरी आपले सहकारी गेल्याने यांना मोठे दुःख झाले आहे. त्यामुळे यांनी दुखवटा पाळलेला आहे. तरीपण प्रशासनाने निलंबन, बदल्या या सत्रामुळे यांच्यात खळबळ माजली आहे. पण कर्मचारी यालाही भिक घालत नसल्याने, एसटी प्रशासन हतबल झाले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने नमते घेत, सोमवार 13 डिसेंबरपासून कामावर हजर राहा असे सक्त आदेशच काढले आहेत.

राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात हा संप इतिहासात नोंद घेण्यासारखा ठरला आहे. यापूर्वी 1972 साली हा संप 14 दिवस चालला होता. आत्ता याने विक्रम मोडीत 35 दिवसहून अधिक झालेला आहे.
“वो बुलाते है, मगर जानेका नही”
एवढे दिवस आंदोलन करूनही एसटी महामंडळाकडून योग्य दखल घेत गेली नसल्याने कामगार वर्गात प्रचंड संताप आहे. निलंबन, बदल्या करून सरकारने हे आंदोलन चिरण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यातच आता एसटी महामंडळ महाव्यवस्थापकानी कामगारांना सोमवारपर्यंत हजर व्हा असे आदेश काढले आहेत. कामगार मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. “वो बुलाते है, मगर कॉल उठानेका, १३ तारीख को भी कामावर जानेका नही” असे गाण्याचे स्टेटस् अनेकांनी आपल्या व्हॉट्सॲपवर ठेवले आहे.



