अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा हाबडा
पोटनिवडणुकीत ६ जागांवर यश
थिंक टँक डेस्क : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर हे प्रकृती अस्वास्थामुळे पक्षीय कामकाजापासून दूर असतानाही बहाद्दूर व एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत (Akola ZP Election Results) हाबडा देत अस्मान दाखवले आहे. १४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) सर्वाधिक सहा जागा जिंकल्या आहेत. .आघाडी करून निवडणूक लढणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या वाट्याला अवघ्या तीन जागा आल्या आहेत.
अकोला जिल्हा परिषदेच्या १४ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या अनुपस्थितीत होणारी ही पहिलीच जिल्हा परिषद निवडणूक होती. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने सर्वाधिक सहा जागा जिंकल्या. सहा जागा जिंकल्यामुळे वंचितची जिल्हा परिषदेतील सत्ताही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ओबीसी सदस्यांचे पद रद्द झाल्याचा फटका
अकोला जिल्हा परिषदेच्या (Akola Zilla Parishad Election Results) पोटनिवडणुकीमुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद पणाला लागली होती. काठावरच्या बहुमताने सत्तेत आलेल्या वंचित बहुजन आघाडीला ओबीसी सदस्यांचे पद रद्द झाल्याचा सर्वाधिक फटका बसला होता.

कार्यकर्त्यांनी लढवला किल्ला
अॅड. प्रकाश आंबेडकरांवर शस्त्रक्रिया झाल्याने ते या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेते, कार्यकर्ते यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी व बलाढ्या भाजपशी सामना करीत बाजी मारली आहे.
शिवसेना व राष्ट्रवादीच्या वाट्याला ३ जागा
अकोल्यात १४ जागांवर पोटनिवडणूक झाली होती. त्यापैकी सहा जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला एक, राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या. भाजप, काँग्रेस व बच्चू कडू यांची प्रहार संघटनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलं. तर, दोन जागी अपक्षांनी बाजी मारली.
ना.बच्चू कडूंच्या प्रहारची जिल्हा परिषदेत एन्ट्री
अकोट तालुक्यातील कुटासा मतदार संघाकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून होतं. इथं आमदार अमोल मिटकरी, आमदार रणधीर सावरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तिथं वेगळं चित्र पाहायला मिळालं. या मतदारसंघात प्रहारच्या स्फूर्ती निखिल गावंडे विजयी झाल्या आहेत. या विजयामुळं बच्चू कडू यांच्या पक्षाची जिल्हा परिषदेत एन्ट्री झाली आहे. तर, अकोट तालुक्यातील अडगाव बु. मध्ये वंचितचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांनी बंडखोरी करत पत्नी प्रमोदिनी यांना उभे केले होते. त्यांनीही विजय मिळवला आहे.
अकोला जिल्हा परिषद : (विजयी/आघाडी)
निवडणूक आलेले उमेदवार
1) घुसर : शंकरराव इंगळे वंचित
2) अंदूरा : मीना बावणे : वंचित
3) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित
4) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित
5) देगाव : राम गव्हाणकर : वंचित
तेल्हारा
6) तळेगांव जिल्हा परिषद संगीता अढाऊ विजयी (वंचित)



