ताजे अपडेट
Trending

आ. शहाजीबापूंनी केला कोळा गटाचा कायापालट

Spread the love

कोळा गटातील हटकर मंगेवाडी, हातीद, जुजारपूर, जुनोनी, किडेबिसरी, कोळा, कोंबडवाडी, पाचेगाव बु. , तिप्पेहळळी या गावांसह अनेक वाड्या वस्त्या विकासकामामुळे नटून गेल्या आहेत.

सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील महत्त्वाचा जिल्हा परिषद गट असलेल्या कोळा गटात आमदार शहाजीबापू पाटील यांनी कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत. कोळा गटात मागील अनेक वर्षांच्या राजकीय इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रमी प्रमाणात प्रथमच विकास निधी आणल्याचे दिसून येत आहे. या गटातील विविध गावांमध्ये करण्यात आलेल्या विकास कामामुळे येथील ग्रामस्थांचे जीवनमान उंचावले आहे.

कोळा गटातील हटकर मंगेवाडी, हातीद, जुजारपूर, जुनोनी, किडेबिसरी, कोळा, कोंबडवाडी, पाचेगाव बु. , तिप्पेहळळी या गावांसह अनेक वाड्या वस्त्या विकासकामामुळे नटून गेल्या आहेत.

कोळा गटातील विविध गावांमध्ये करण्यात आलेल्या विकास कामाचे स्वरूप, निधी आणि विकास कामांची स्थिती खालील प्रमाणे…

कोळा : या गावात एकूण तब्बल २२ कोटी २६ लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत. यामध्ये एकूण कामे : ४७, पूर्ण कामे : २७, सुरू कामे : ३, निविदा प्रक्रिया : १०, प्रलंबित कामे : ७.

हटकर मंगेवाडी : या गावामध्ये एकूण ४० कोटी ६१ लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत. एकूण कामे : १९, पूर्ण कामे : ९, सुरू कामे : ३, निविदा प्रक्रिया : १, प्रलंबित कामे : १.

हातीद : या गावामध्ये एकूण १८ कोटी ८७ लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत. एकूण कामे : २६, पूर्ण कामे : १७, निविदा प्रक्रिया : ६, प्रलंबित कामे : ३.

जुजारपूर : या गावात एकूण ९ कोटी ८५ लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत. एकूण कामे : २३, पूर्ण कामे : १५, सुरू कामे : २, निविदा प्रक्रिया : ३, प्रलंबित कामे : ३.

जुनोनी : या गावात एकूण ५ कोटी ७२ लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत. एकूण कामे : १८, पूर्ण कामे : ९, सुरू कामे : १, निविदा प्रक्रिया : ८.

किडेबिसरी : ४ कोटी ९४ लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत. एकूण कामे : १३, पूर्ण कामे : ९, सुरू कामे : ३, निविदा प्रक्रिया : १.

पाचेगाव बु. : या गावात एकूण २ कोटी १५ लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत. एकूण कामे : १६, पूर्ण कामे : १५, सुरू कामे : १.

तिप्पेहळळी : या गावात एकूण २२ कोटी ६ लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली आहेत. त्यामध्ये एकूण कामे : ३१, पूर्ण कामे : १०, सुरू कामे : ६, निविदा प्रक्रिया : १०, प्रलंबित कामे : ५.

या गावांमध्ये अनेक वर्षांपासून ही कामे प्रलंबित होती. आमदार शहाजी बापू यांनी या अडचणी विचारात घेऊन या भागातील असंख्य कामे मार्गी लावली आहेत.

कोणत्या गावात कोणती कामे करण्यात आली त्याची सविस्तर यादी खालील प्रमाणे आहे..
(“पाणीदार आमदार” या कार्य अहवालावर आधारित मजकूर)

 

 

 

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका