सांगोल्यात ग्राम रोजगार सेवकांचे कामबंद आंदोलन आ. ॲड. शहाजीबापू पाटील यांना दिले निवेदन

आ. ॲड. शहाजीबापू पाटील यांना दिले निवेदन

Spread the love

सांगोला/ एच. नाना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेची अंमलबजावणी सुरू करताना ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी सांगोला तालुक्यातील ७६ ग्रामरोजगार सेवक कामबंद आंदोलन उतरले असून आ. ॲड. शहाजीबापू पाटील यांना हे निवेदन दिले.

गेली कित्येक वर्षापासून ग्रामरोजगार सेवक हे गावपातळीवर तुटपुंज्या टक्केवारीवर काम करीत आहे. पण त्यांना त्याची ही टक्केवारी वेळेवर मिळत नाही. जॉबकार्ड तयार करण्यापासून ते कामाचे मस्टर वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यापर्यंत ही कामे यांना करावी लागत आहे. खरे तर वर्षानुवर्ष याच्या या मागण्या शासन दरबारी पडून आहेत. अर्धवेळ कर्मचारी हे पद रद्द करून पूर्णवेळ कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत समावेश करावा, मानधन रद्द करून मासिक वेतन देण्यात यावे, ग्रामरोजगार सेवकास सेवा बजावताना प्रवास खर्च व दैनिक भत्ता देण्यात यावा.

सदर योजनेची रेषा ६०:४० असून त्यामध्ये बदल करून शेतकऱ्यांना उपयुक्त करावा आणि शेतीची सर्व कामे या योजनेतून व्हावी अश्या यांच्या मागण्या आहे.

आज या सर्व मागण्याचे निवेदन आ. पाटील यांना देण्यात आले. यावेळी आ. पाटील म्हणाले की, रोहयो मंत्री संदीपान भुंमरे यांच्याकडे यासाठी पाठपुरावा करून तुम्हाला न्याय देण्यासाठी मी तुमच्या बरोबर लढणार आहे. यावेळी अध्यक्ष तुकाराम मिसाळ, लक्ष्मण लेंडवे, गौतम गंगने, शंकर गडहिरे, नवनाथ पवार, गणेश बाबर, तानाजी ईरकर, दादासो घाडगे यांच्यासह अन्य रोजगार सेवक यावेळी उपस्थित होते.

ग्राम रोजगार सेवकच्या विविध मागण्याचा प्रश्न येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत मार्गी न लावल्यास तसेच त्यामध्ये विचारविनिमय न झाल्यास रोजगार हमी योजनेची कामे पूर्णपणे बंद केली जातील. त्यानंतर राज्यभरातील २७ हजार ५०० ग्राम रोजगार सेवक यामध्ये भाग घेतील.

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका