ताजे अपडेट
Trending

शहाजीबापूंच्या प्रयत्नाने मंगळवेढा-घेरडी-जत रस्ता होतोय चकाचक

Spread the love

गेली कित्येक वर्षे या रस्त्याच्या कामाची प्रतीक्षा होती. सर्वांना हा सोईचा असा मार्ग होता. सोलापूर, मंगळवेढा, घेरडी, जत, बिळूर, अथणी ते येळगी असा हा राज्यमार्ग आहे. माजी आ. शहाजीबापू पाटील यांच्यामुळेच हा चार दशकांचा रस्त्याचा मार्ग खुला झाला असून प्रत्यक्षात कामास सुरुवातही झालेली आहे.

सांगोला / नाना हालंगडे
मंगळवेढा-शिरशी-घेरडी-जत ते कर्नाटकातील येळगी या राज्यमार्गावरील सांगोला तालुक्यातील २२ किलोमिटरच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणास युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्हा हद्दीपर्यंत २२ किलोमिटर अंतराचा हा रस्ता आहे. या मार्गावर लहान-मोठे असे ३९ पूल नव्याने बांधण्यात येत आहेत. तब्बल चाळीस वर्षांनंतर हा रस्ता कात टाकत असून या रस्त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे. माजी आमदार शहाजी बापू यांनी या रस्त्यासाठी तब्बल 177 कोटी 60 लाख रुपये निधी खेचून आणला असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रस्त्याचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन झाले होते. आगामी काही महिन्यात हा रस्ता पूर्ण होणार आहे.

गेली कित्येक वर्षे या रस्त्याच्या कामाची प्रतीक्षा होती. सर्वांना हा सोईचा असा मार्ग होता. सोलापूर, मंगळवेढा, घेरडी, जत, बिळूर, अथणी ते येळगी असा हा राज्यमार्ग आहे. माजी आ. शहाजीबापू पाटील यांच्यामुळेच हा चार दशकांचा रस्त्याचा मार्ग खुला झाला असून प्रत्यक्षात कामास सुरुवातही झालेली आहे.

आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत प्रकल्पांतर्गत टप्पा क्रमांक 3 व केंद्रशासन साह्यअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वाणीचचिंचाळे गावाची हद्द ते घेरडी, पारे, डिकसळ, वायफळ, जत, बिळूर ते येळगी असा हा मार्ग आहे. यातील सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः सांगोला तालुक्यातील २२ किलोमिटर रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या संपूर्ण 156 किमीच्या रस्त्याचे 177 कोटी 60 लाख रुपये निधीतून हा रस्ता काँक्रिटीकरण करुन बांधण्यात येणार आहे. यातील सांगोला तालुक्यातील या रस्त्यासाठी ४५ कोटी रुपयाचा निधी आहे.

यातील २२ किलोमिटर अंतरातील मार्गावर ३९ लहान मोठे पूल बांधण्यात येत आहेत. यातील ६ पूल हे मोठे आहेत. सद्या याच सर्वच पुलांची कामे गतीने सुरू आहे. हे सर्व काम होण्यास साधारण दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे.

रस्त्याची कामे पूर्ण झाल्यावर रस्त्यालगत प्रवासी निवाराशेड, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करून उत्कृष्ट रस्ता तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामासाठी अँड. माजी आम.शहाजीबापू पाटील यांनी निधी आणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचे ऑनलाईन भूमिपूजनही केले आहे. चार दशकांचा या रस्त्याचा प्रश्न केवळ शहाजीबापू यांच्यामुळेच सुटलेला आहे.

शहाजीबापू पाटील आणि दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्यामुळे आमचा ४० वर्षाचा वनवास संपलेला आहे. आम्हाला सोलापूरला जायचे म्हटले तर मार्गच बदलून जावे लागतं होते. पावसाळ्यात घेरडी गावालगतच्या दोन्ही ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने खूपच अडचण येत होती. आता दोन्ही ठिकाणी मोठे पूल होत आहेत. त्यामुळे आमचा कायमचाच प्रश्न मिटणार आहे, अशी प्रतिक्रिया दिलीप मोटे (माजी सरपंच घेरडी) यांनी दिली.

३९ लहान-मोठे पूल
मंगळवेढा तालुक्यातील शिरसी हद्द ते डिकसळ घाट रस्ता या सांगोला तालुक्यातील मार्गावर ३९ लहान मोठे पूल आहेत. यातील ६ पूल हे मोठे आहेत. तर ३३ पूल हे लहान आहेत. सद्या या २२ किलोमिटर अंतरावरील मार्गावर पुलांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी मार्गावर लगतने रस्तेही करण्यात आले आहे. हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणाचा आहे. याच पुलांच्या कामानंतर मुख्य रस्त्यांचे काम करण्यात येणारं आहे.

शहाजीबापू पाटील आणि दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्यामुळे आमचा ४० वर्षाचा वनवास संपलेला आहे. आम्हाला सोलापूरला जायचे म्हटले तर मार्गच बदलून जावे लागतं होते. पावसाळ्यात घेरडी गावालगतच्या दोन्ही ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने खूपच अडचण येत होती. आता दोन्ही ठिकाणी मोठे पूल होत आहेत. त्यामुळे आमचा कायमचाच प्रश्न मिटणार आहे, अशी प्रतिक्रिया दिलीप मोटे (माजी सरपंच घेरडी) यांनी दिली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका