ताजे अपडेटराजकारण

शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे धाराशिव जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख

Spread the love

 

सोलापूर– शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचे पद मिळाल्यापासून चार महिन्याच्या कालावधीतील कामाचा धडाका पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्यावर धाराशिव जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी निवड करून पदभार सोपवला व तसे नियुक्तीपत्र प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांना दिले.

शिवसेनेचा राज्य प्रवक्तेपदी डॉ. वाघमारे यांची निवड होताच सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव झाला पद मिळताच डॉ.वाघमारे यांनी कामाला सुरुवात केली. शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत सर यांचा नेतृत्वाखाली मोदी विभागात महाआरोग्य शिबिर घेऊन 11000 रुग्णांना त्याचा लाभ मिळवून दिला. या शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहून शहरात त्यानंतर दहा वेगवेगळ्या ठिकाणी अशी महाआरोग्य शिबिरे घेतली गेली. यामधून जवळपास दीड लाख रुग्णांना या शिबिराचा लाभ मिळाला.

तसेच शहरातील सात रस्ता ते जुना एम्प्लॉयमेंट चौक यादरम्यान असलेल्या व्हीआयपी रोडवर एका परप्रांतीय व्यवसायिकाने मोची नावाने दुकान थाटले होते त्या दुकानात असलेल्या चप्पल आणि बुटांवर मोची हे नाव प्रिंट करण्यात आले होते यावेळी हा मोची समाजाचा अवमान व अपमान आहे म्हणून यावर आवाज उठवला व संबंधित दुकान मालकावर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करावा असा आशयाचे निवेदन पोलीस आयुक्तांना दिले व संबंधित दुकानासमोर तीव्र आंदोलन केले. यावेळी दुकान मालकाने मोची अक्षर असलेल्या व विक्रीस ठेवलेल्या दुकानातील सर्व चप्पल व बूट काढून टाकले.

राज्य प्रवक्ते पद मिळाल्यानंतर कमी कालावधीतच प्रा. डॉ . ज्योती वाघमारे यांच्या कष्ट आणि जिद्दीचा धडाका पाहून राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉक्टर वाघमारे यांच्यावर धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख पदाची धुरा सोपवली.

निवडीचे पत्र देताना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी विधानपरिषदेचे उपसभापती नीलम ताई गोरे प्रवक्त्या शितल म्हात्रे, मनीषा कायांदे, प्रवक्ते नरेश मस्के, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे,युवा सेना शहरप्रमुख अर्जुन शिवसिंहवाले,भीमा वाघमारे आदी उपस्थित होते

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका