“सांगोल्यातले प्रश्न तातडीनं मार्गी लावू”
मुख्यमंत्र्यांनी आ. बाबासाहेबांना केलं आश्वस्त

नागपूर : विशेष प्रतिनिधी
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ग्रामविकास मंत्री मा.ना.जयकुमार गोरे व दौंडचे आमदार मा.राहुल कुल देखील उपस्थित होते.
या भेटीत सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मकता दाखवत सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी स्वर्गीय आमदार भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला व सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रलंबित प्रश्न सोडविण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवल्याने आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचे आभार मानले.
आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांना वाचा फोडत यापूर्वीच्या अधिवेशनात आवाज उठवला आहे. मागील दहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी राज्य सरकारमधील बहुतांशी खात्यांच्या मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांनी अनेकदा भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांनी आ. बाबासाहेबांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला मतदारसंघाला विकास निधी दिला आहे. विविध शासकीय योजनांचा सांगोला तालुक्यातील जनतेला मोठा फायदा होताना दिसत आहे. अशातच सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तालुक्याच्या विकासाला चालना देणार असल्याचे अभिवचन दिल्याने सांगोला तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



