खा. संजय राऊतांकडून दीपकआबांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत
पक्ष प्रवेशासाठी शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. बाळासाहेब मागाडे
सांगोल्याची जागा ही शिवसेनेची आहे. तिथे शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. या जागेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही दावा नाही, असे सांगत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. खा. संजय राऊत हे मुंबई येथे पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यात राजकीय भूकंप घडून आला आहे.
पक्षाला रामराम ठोकताच माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा निर्णय त्यांनी सोशल मीडियाद्वारे घोषित केला आहे.
शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेताच त्यांचे शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
कार्यकर्त्यांत नवचैतन्य
माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी शिवसेना उध्दव ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेताच त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांत नवचैतन्य संचारले आहे. यंदा आबा फिक्स आमदार ही खूणगाठ मनाशी बांधली आहे.



