ताजे अपडेट
Trending

भाईंच्या देवराईने गरिबांची दिवाळी गोड केली : आ. रणजितसिंह मोहिते-पाटील         

देवराईची राज्यभर चर्चा; देवराई पाहून दादाही खुश       

Spread the love

सांगोला/प्रतिनिधी

स्व.आबासाहेबानी सांगोला तालुक्याचे 50 ते 60 वर्षे नेतृत्व केले. तेही चांगल्या पद्धतीने. त्याच आबासाहेबांच्या स्मृती अजरामर राहाव्यात म्हणून जो देवराई प्रकल्प आहे तोही आदर्शवत असाच आहे. आज गरिबांची दीपावली यांनी गोड केली हे खुप मोठे काम आहे, असे आम.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

सांगोला तालुक्यातील डिकसळ येथे दोन एकरामध्ये आबासाहेबांच्या स्मृती अजरामर राहाव्यात म्हणून मागील दोन वर्षापूर्वी ही संकल्पना राबविण्यात आली असून,याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. याच भाईंच्या देवराईच्या वतीने डिकसळ गावातील 52 कुटुंबियांना दीपावली फराळ व भाऊबीज भेट म्हणून साड्या वाटप आम.रणजितसिंह मोहिते – पाटील यांच्या प्रमुख उपस्थित तर पुरोगामी युवक संघटनेचे राज्यध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षेखाली हा फराळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

याचवेळी पुढे बोलताना मोहीते -पाटील म्हणाले की, श्रीमंतांची दीपावली आपण पाहतच आहोत. पण गरिबांची दीपावली तुम्ही सर्वांनी गोड केली. ही आदर्श कामाची पोहच आहे. आज मीही या देवराई बदल बऱ्याच गोष्टी जाणून आहे. असेच चांगले काम करीत राहा. स्व आबा साहेबांच्या कार्याप्रमानेच डॉ. बाबासाहेब देशमुख यांचेही काम तालुकाभर चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्यांना बळ देण्यासाठी तुम्ही सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे. याच देवराईमुळे तुम्ही गोर गरिबांची दीपावली गोड केली हे भूषणावह आहे.

अशाच प्रकारे सर्व समावेशक कामे सतत करीत राहा. मीही तुमच्या सोबत सतत असणार आहे.हीच हम रस्त्यावरील भाईंची देवराई पाहून मीही आनंदी झालो असून,येथे माझ्या आमदार फंडातून चांगल्या प्रकारचे काम करण्यात येतील,असेही मोहिते पाटील यांनी शेवटी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, भाईंच्या कार्याची अजरामर अशी वास्तूचं डिकसळवासियानी साकारली आहे. येथे सतत समाज उपयोगी उपक्रम राबवून एक प्रकारे स्व.आबासाहेबांच्या स्मृती जपलेल्या आहेत. आजही गावातील 52 गोरगरीब कुटुंबीयांची यांनी दीपावली गोड केली आहे. हे खूप मोठे काम आहे. असेच समाज उपयोगी कामे करीत राहा,आम्हीही तुमच्या सोबतच आहेत,असेही डॉ.देशमुख म्हणाले.

यावेळी या कार्यक्रमास राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य चिटणीस सोमाआबा मोटे, प्रा.किसन माने,दत्ताभाऊ टापरे,महेश नलवडे,श्रीपती वगरे,राजू गेजगे सर,गणेश पाटील,काकासाहेब करांडे सर,सीताराम करांडे सर,संजय पाटील सर यांच्यासह मान्यवर मंडळी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हाइस चेअरमन तुकाराम भूसनर सर यांनी तर आभार महेश बंड गर यांनी मांडले. यावेळी देवराई प्रतिष्ठानचे सर्व सदस्य,गावासह आसपासच्या गावातील लोकप्रतिनिधी,ग्रामस्थ,महिला व युवक वर्ग मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका