ताजे अपडेट
Trending

शिट्टी वाजली अन् गाडी सुटली….

डॉ.बाबासाहेबांना डॉक्टर पत्नीची साथ

Spread the love

त्या आपल्या एक वर्षाच्या तानुल्या मुलीला माहेरी सोडत, पती अन् सांगोला विधानसभेचे अधिकृत उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ जीवाचे रान करीत या निवडणुकीचा माहोल गाजवीत आहेत. त्यांचे तालुक्यातील ग्रामीण भागात जल्लोषात स्वागत होत असून, कोळा येथे चक्क बैल गाडीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

चर्चा तर होणारच/ नाना हालंगडे
शिट्टी वाजली अन् गाडी सुटली….अशीच प्रचिती आता सांगोला तालुक्यात येत आहे. गेली १५ दिवसापासून डॉ. बाबासाहेब देशमुख यांची धर्मपत्नी डॉ.निकिताताई बाबासाहेब देशमुख ह्या तालुकाभर गावभेटी देत प्रचार यंत्रणा राबवित आहेत.

त्या आपल्या एक वर्षाच्या तानुल्या मुलीला माहेरी सोडत, पती अन् सांगोला विधानसभेचे अधिकृत उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ जीवाचे रान करीत या निवडणुकीचा माहोल गाजवीत आहेत. त्यांचे तालुक्यातील ग्रामीण भागात जल्लोषात स्वागत होत असून, कोळा येथे चक्क बैल गाडीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

स्व.आबासाहेबांचे विचार अजरामर ठेवण्यासाठी याही जीवाचे रान करीत आहेत. स्व.आबासाहेबांचे विचार, केलेल्या कामांना उजाळा देण्यासाठी डॉक्टर पती-पत्नी गेली चार वर्षापासून तालुक्यात काम करीत आहेत. उच्च विचार सरणी, साधे राहणीमान अशीच डॉ.बाबासाहेब यांची ही ओळख आहे. तालुक्यातील जनतेच्या मनावर यांनी अधिराज्य गाजविले आहे. त्यामुळे आबासाहेब प्रती बाबासाहेब अशी ही यांची ओळख आहे.

यांच दरम्यान ताई ह्या सर्वांना समवेत घेत, तुम्ही सर्वचजण सुज्ञ नागरिक आहात. आबासाहेबांचे विचाराचे मानणारे आहात. इथून पुढे हेच विचार अन् त्यांच्याच प्रमाणे कार्य हे डॉ.बाबासाहेब देशमुख करतील. त्यामुळे सर्वांनीच जोमाने शिट्टी वाजवित विक्रमी मताने यांना विधानसभेत पाठवा, असे त्या आवाहन करत आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका