सांगोले में सिर्फ आनंदा माने
नगरपालिका रणसंग्राम; धनुष्यबाणाने घेतली प्रचारात आघाडी

विशेष वृत्त/ डॉ.नाना हालंगडे
सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणसंग्राम पेटला आहे. पायाला भिंगरी लावून उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे. त्यातच कालच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी आपल्या दिलखुलास भाषणात कोई माने या न माने सांगोले मैं अनंदाभाऊ माने एक नंबर असच डायलॉग मारून निवडणुकीत नवचेतना आणली आहे.त्यातच माजी आमदार अँड शहाजीबापू पाटील यांनी मी राजा आहे, राज्यासारखेच वैभव सांगोल्याला मिळवून देणार असे सांगितले आहे.
विशेष म्हणजे सांगोल्याच्या इतिहासात प्रथम एका पॅनलची निवडणूक एकाच म्हणजे धनुष्यबाण चिन्हावर होत असून,बापूंची सेना प्रचारात अग्रस्थानी आहे.शहरासह सर्वच वार्डत सेनेची गाणी,केलेली विकासकामे धुमत आहेत. यात सागर पाटील,रफिकभाई नदाफ,दादासाहेब लवटे,गुंडा खटकाळे,संजय देशमुख यांच्या सह आनंदा माने,पप्पू ऊर्फ प्रशांत धनवजिर यांच्यासह सर्वच महिला आघाडीने प्रचारात घर आहे.

शिवसेनेकडून हे उमदेवार रिंगणात
प्रभाग एक_ राणी आनंदा माने
प्रभाग दोन _अ मध्ये प्रशांत धनवजीर व् वैशाली सतीश सावंत
प्रभाग तीनमध्ये_ गोदाबाई बनसोडे व् अरुण सदाशिव पाटील
प्रभाग चार आशादेवी यावलकर व् ज्ञानेश्वर तेली
प्रभाग पाच अ मध्ये काशिलिंग गावडे व् छाया मेटकरी
प्रभाग 6 अ मध्ये सीमा सरगर व् चैतन्य राऊत
प्रभाग सात अ मध्ये सुनील सुळे व् भाग्यवती सावंत
प्रभाग अठ मध्ये शितल लादे व् शोभा देशमुख
प्रभाग 9 अ मध्ये आनंद दौंडे, व् सना शेख
प्रभाग 10 अ मलिका मनेरी व् विवेक पाटील
प्रभाग 11 अ मध्ये जाकेरा तांबोळी, अनिता केदार व् नितीन इंगोले असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी अकरा उमेदवार असले,तरी खरी लढत ही सेनेचे आनंदा माने अन् भाजपाचे मारुती बनकर यांच्यातच होणार आहे.ही निवडणूक शहाजीबापू पाटील यांच्याही प्रतिस्तेंची आहे.त्यामुळे आनंदा माने आणि त्यांची टीम जोमाने कामाला लागली आहे.
शहरातील जनतेच्या गळ्यातील ताईत अशीच आनंदाभाऊ माने यांची ओळख. गतवेळच्या निवडणुकीत साधलेला विकास,शहाजीबापूंनी शहरात मोठ्या प्रमाणात केलेली विकासकामे यांना निवडणुकीत विजयाच्या नांदी देत आहेत.त्यातच स्वतःच्या चीन्हा बरोबर आपल्या सर्वच सहकाऱ्यांचे एकच चिन्ह असल्याने यांना प्रचार करणे अगदी सोपे झाले आहे.यांचे शहरात होम टू होम दोन राऊंड ही झाले आहेत.त्यामुळे आनंदा माने किंगमेकर असल्या सारखे वाटत आहे.
प्रत्येक क्षण विकासासाठी
अँड.शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली आनंदा माने आणि त्यांची टीम २४ तास जनसेवेत तरबेज असते. समाजातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देणे त्यांच्या अडीअडचणी सोडविने हेच यांचे ध्येय आहे.शहरात यांची विशेष अशी क्रेझ आहे.विकासाभिमुख चेहरा अशीच यांची ओळख आहे.त्यामुळे सध्या तरी यांचे पारडे जड आहे.भविष्याच्या वेध घेवून यांना सांगोला सुजलाम सुफलाम करावयाचा आहे.
धनुष्यबाण घराघरात
राज्यात एकत्र असलेल्या पण सांगोल्यात बिघाडी झाल्याने, सध्या सेनेचा धनुष्यबाणाने सांगोला शहरात आघाडी घेतली आहे. हेच सेनेचे धनुष्यबाण घराघरात पोहचले आहे. त्यातच कालच सेनेचे उपमुख्यमंत्री ना.शिंदे साहेबांची सभा झाल्याने निवडणूक रणसंग्रामात रंगत आलेली आहे.



