“आनंद” आहे “प्रशांत” विजय मिळवण्याचा
नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ; वजिराची खेळी प्रशांत विजयाची

सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी तब्बल ९ वर्षांनी रंगली असून यात शिवसेनेचे उमेदवार आनंद यांना प्रशांत विजयाची गुरुकिल्लीच सापडली आहे. त्यात नगराध्यक्ष पदासह २३ उमेदवारही मोठ्या मतांनी विजयी होणार असल्याचे, प्रभाग २अ चे उमेदवार प्रशांत ऊर्फ पप्पू धनवजिर यांनी सांगितले.
सांगोला नगरपालिका निवडणुकीत आनंद_प्रशांत ची जोडगोळी जीवाचे रान करीत प्रचार यंत्रणा राबवून,आम्ही सांगोल्याच्या विकासासाठी कसे कठीबद्ध आहोत हे जनतेला सांगत आहेत. त्यातच आनंदा माने यांच्या पत्नी,स्वतः आनंदा माने अन् पप्पू अर्थात प्रशांत धनवजिर यांनी गतवेळी मोठ्या प्रमाणात विकास साधत शहराचा चौफेर विकास केला आहे. यांना माजी आमदार अँड.शहाजीबापू पाटील यांचे हत्तीचे बळ असून,आता तर राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी अधिकचे बळ दिल्याने याच्यात नवचेतना निर्माण झाली आहे.
याच निवडणुकीत एक अग्रगण्य आणि प्राधान्याने नाव घेतले जाते ते प्रशांत ऊर्फ पप्पू धनवजिर याचे. हे किंगमेकर असून, आनंदा भाऊ यांची प्रचाराची सर्वच सूत्रे यांच्या सहमतीनेच हालतात.गतवेळच्या २०१६ च्या निवडणुकीत हेच प्रशांत प्रभाग क्रमांत ३ मधून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या प्रभागाचा कायापालट केला होता.आता त्यांनी प्रभाग बदलला असून प्रभाग २ मधून हे निवडून रिंगणात आहेत.याच प्रभागात साडे तीन हजार इतके मतदान आहे. यामध्ये भीमनगरचा ४० टक्केभाग,साठेनगर,कोपटेवस्ती,बिलेवाडी,आनंदनगर,देशमुखवस्ती आदीच समावेश होतो. यातूनच पत्रकार सतीश सावंत यांच्या सुविद्य पत्नी सौ.वैशाली सावंत ह्याही निवडून रिंगणात आहेत.

प्रशांत धनवजिर जरी प्रभाग दोन अधून निवडणूक रिंगणात असले,तरी संपूर्ण अकरा प्रभागाची जबाबदारी ही हे आनंदाभाऊ यांच्या जोडीने पार पाडीत आहेत.यांची ही वजिराची खेळी आनंदभाऊ यांच्या संपूर्ण सेनेची विजयाची चाहूलच देत आहे.त्यामुळे तर आनंद आहे,प्रशांत विजय मिळविण्याचा याच बापूंच्या सेवेला.
विकास तुमच्या दारी
विश्वासाने साथ द्या,विकास तुमच्या दारी आणण्याचं मी वचन देतो.आनंदाभाऊ अन् मी स्वतः तुमच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध आहे.त्यातच गतवेळी सर्वागीण विकास आम्हीच केला आहे.अजूनही शहराचा चौफेर विकास आम्हाला करावयाचा आहे,त्यामुळे तुम्ही आम्हाला साथ द्या,असे प्रभाग दोन चे उमेदवार प्रशांत ऊर्फ पप्पू धनवजिर यांनी सांगितले.



