ताजे अपडेट
Trending

प्रा.शिल्पा ठोकळे यांनी पेटंट मिळाले

Spread the love

नाना हालंगडे

सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रा.सौ शिल्पा ठोकळे- तोरणे मॅडम यांना इंडियन पेटंट ऍडव्हान्सड सर्च सिस्टीम यांच्यामार्फत पेटंट मिळाले आहे.

   प्रा. सौ शिल्पा ठोकळे- तोरणे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठांमध्ये भौतिकशास्त्र विषयामध्ये संशोधन सुरू आहे. विद्यापीठामधील भौतिकशास्त्र विभागाचे संचालक प्रा. डॉ. बी जे लोखंडे हे मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत.तसेच यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या पेटंट चे काम पूर्ण झाले आहे.

      भौतिक शास्त्रातील केमिकल बाथ डिपॉझिटेड पॉलिनिलिन आयर्न ऑक्साईड कंपोझिट इलेक्ट्रोड्स फोर सिमेट्रिक सुपर कॅपॅसिटर डिव्हाइस या विषयावर त्यांना पेटंट मिळाले आहे.

      प्रा. सौ शिल्पा ठोकळे मॅडम यांना या पेट्ंटसाठी प्रा. डॉ. आर सी अंबारे प्रा.डॉ.पी ए महानवर आणि ऋषिकेश बोबडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

   ठोकळे मॅडम यांचे मूळ गाव सोनंद आहे.प्रताप नामदेव ठोकळे व माता लताबाई ठोकळे त्यांना पाच मुले होती.ते सोनंद येथे टेलर काम करीत होते.अतिशय नाजूक परिस्थितीतून त्यांनी त्यांच्या पाचही मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देवून आपले कर्तव्य पार पाडले.

    शिल्पा ठोकळे मॅडम यांचे प्राथमिकचे शिक्षण जि.प्र. प्राथमिक शाळा सोनंद, माध्यमिकचे शिक्षण सोनंद हायस्कूल सोनंद, ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे झाले होते. त्यांनी ग्रॅज्युएशन डॉ.गणपतराव महाविद्यालय सांगोला येथे पूर्ण केले व त्याच्यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पूर्ण केले. त्याच्यानंतर त्या न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज सांगोला येथे प्राध्यापक म्हणून सेवेत रुजू झाल्या.

नोकरी करत असताना त्यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांमध्ये भौतिकशास्त्र विषयामध्ये पीएचडी चे काम सुरू केले आहे.पीएचडीचे काम दोन-तीन महिन्यात पूर्ण होईल,असेही प्रा.शिल्पा ठोकळे यांनी सांगितले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका