ताजे अपडेट
Trending

डिकसळ येथील धावपटू शशिकांत चव्हाण यांचा दीपकआबांच्या हस्ते सत्कार

Spread the love

गरीबाच्या पोरानं नाव कमवलं आणि गावाचं नाव राज्यात उज्वल केलं आहे. या विद्यार्थ्यांचा आदर्श तालुक्यातील इतर तरुणांनी घ्यावा, असे उद्गार सत्कार प्रसंगी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी काढले.

सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील ऊसतोड कामगारांचा मुलगा शशिकांत जगू चव्हाण याने परिस्थितीशी झुंज देऊन राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत यशस्वी गरुड झेप घेत, द्वितीय क्रमांक पटकावित यशाचा मानकरी ठरला आहे. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

यावेळी मधुकर करताडे, ग्रामपंचायत सदस्य रणजीत गंगणे, पारे ग्रामपंचायतचे माजी सरपंच संतोष पाटील, युवक नेते राजाभाऊ गुजले आदी उपस्थित होते.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या क्रॉस कंट्री या स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता फी भरण्यासाठी पैशाची टंचाई असताना अशा परिस्थितीमध्ये, व आई-वडील ऊसतोडी करीत असताना, परिस्थितीशी संघर्ष करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सोलापूर येथील मैदान गाजवले. तालुक्याचे नाव उज्वल केले. या निमित्ताने गोरगरीब कुटुंबातील या विद्यार्थ्यांचे कौतुक व्हावे त्याच्यावर शाबासकीची थाप पडावी आणि यातून नव्या उमेदीने आणि उत्साहाने पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून शिवसेना नेते मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी शशिकांत चव्हाण या धावपटूचा सन्मान केला आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. यातून इतर विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा आणि शशिकांत चव्हाण याचा आदर्श घेऊन आपले व आपल्या गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा ही दिल्या आहेत.

गरीबाच्या पोरानं नाव कमवलं आणि गावाचं नाव राज्यात उज्वल केलं आहे. या विद्यार्थ्यांचा आदर्श तालुक्यातील इतर तरुणांनी घ्यावा, असे उद्गार सत्कार प्रसंगी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी काढले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका